गट-क व गट-ड (पूर्वीचे वर्ग-३ व वर्ग-४) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबंधीची योजनेतील मुद्यांचे स्पष्टीकरण

Photo of author

By Sarkari Channel

शासन सेवेत गट-क व गट-ड संवर्गात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत किवा उपलब्ध असल्या तरी पदोन्नती मिळण्यास प्रदिर्घ कालावधी लागतो. अशा कर्मचा-यांना १२ वर्षाच्या नियमित सेवेनंतर वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्याबाबतचे आदेश संदर्भाधीन दिनांक ८ जून, १९९५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत अवलंबावयाची कार्यपध्दत, अटी व शर्ती देखील सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.

१२ वर्षाच्या नियमित सेवेनंतर वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्याबाबतच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना तसेच त्या अनुषंगाने विभागाना येणा-या अडचणीबाबत काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या, त्यातील सामाईक मुद्दे व त्यावरील स्पष्टीकरण शासनाकडून खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment