सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत स्पष्टीकरण

Photo of author

By Sarkari Channel

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शासन सेवेत क॑माल दोन वेळा वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय करण्याबाबतची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येऊन वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत अबलंबावयाची कार्यपध्दत, अटी व शर्ती देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.

तथापि वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबतच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना तसेच त्या अनुषंगाने विभागांना येणा-या अडचणीबाबत काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या, त्यातील सामाईक स्वरुपाच्या मुद्यांवर स्पष्टीकरणात्मक आदेश महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक : वेतन -११११/प्र.क्र.८/सेवा ३ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२, दिनांक : १ जुलै, २०११ या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहेत.

नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचा-यांची तत्पू्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबध्द पदोन्नती /आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरण्याबाबत

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय, क्रमांक-आप्रयो-१०१२/प्र.क्र.७१/सेबा ३ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक -१९/१/२०१३ नुसार शासकोय कर्मचा-यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा तत्सम निवड मंडळामार्फत नामनिर्देशनाने / सरळ सेवेने दुस-या शासकीय पदावर नेमणूक झाल्यास त्या कर्मचा-याची नामनिर्देशनाने नियुक्‍तीपूर्वीची सेवा कालबध्द पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी खालील अटींच्या अधीन राहून ग्राह्य धरण्यात यावी.

  1. शासकोय कर्मचा-याने लोकसेवा आयोग किंवा तत्सम निवड मंडळाने विहित केलेल्या मार्गाने अर्ज केलेला असावा.
  2. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम १४ व त्याखालील टीप १ ब २ मधील तरतुदीप्रमाणे पूर्वीची सेवा ब नविन नियुक्‍्तीमध्ये २४ तासांपेक्षा अधिक खंड असू नये. तसेच संबंधित कर्मचा-याला पूर्वीच्या कार्यालयातून त्याला विहित मार्गाने कार्यमुक्त केलेले असावे.
  3. शासकोय कर्मचा-याची नामनिर्देशनाने / सरळ सेवेने नियुक्ती झालेले पद नामनिर्देशनापूर्वीच्या पदास समकक्ष असावे. कर्मचा-याची नियुक्‍ती उच्च किंवा कनिष्ठ पदावर झाल्यास पूर्वीची सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरता येणार नाही.
  4. शासकीय कर्मचा-याची नामनिर्देशनापूर्वीची नियमित सेवा विचारात घेण्यात याबी तसेच उपरोक्‍त योजनांच्या शासन निर्णयातील अटी/शर्तीनुसार पात्र असल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
  5. नामनिर्देशनापूर्वीची केबळ राज्य शासनाकडील सेवा या आदेशातील तरतुदींकरिता ग्राह्य धरण्यात येईल.

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलयास करावयाची कार्यवाही

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांकः आप्रयो- १०१५ /प्र.क्र. १११ /२०१५/सेवा- ३ तारीख : २३ डिसेंबर, २०१५ नुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना या योजनेखाली पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, मात्र दिलेल्या लाभांची वसूली करण्यात येणार नाही. हे शुध्दीपत्रक या आदेशाच्या दिनांकापासून लागू होईल.

समावेशानाने नवीन विभागात नियुक्‍त झालेल्या कर्मचाऱ्यास समावेशानाच्या पदावरील पदोन्नतीच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ देण्याबाबत

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वेतन-१०१४/प्र.क्र.१६/सेवा-३ तारीख:१६ जुलै, २०१६ नुसार मूळ विभागात कालबध्द पदोन्नती/ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना/सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ घेऊन अतिरिक्‍त ठरलेल्या व नवीन विभागात समावेशानाने नियुक्‍त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील नवीन विभागातील पदोन्नतीच्या साखळीतील पदासाठी विहित केलेली विभागीय परीक्षा / अर्हता परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या तारखेपासून नवीन विभागात त्यांनी धारण केलेल्या पदास, पदोन्नतीच्या साखळीतील पदाच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय राहील.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत दुसरा लाभ अनुज्ञेय करणेबाबत

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.१०.२००६ ते दि.३१.०३.२०१० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत दुसरा लाभ अनुज्ञेय आहे किंवा कसे? याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग
झासन शुध्दीपत्रक क्रमांकः वेतन – ११११/प्र.क्र. ८/सेवा- ३ तारीख : ०९ डिसेंबर, २०१६ अन्वये खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

जे कर्मचारी/ अधिकारी हे दिनांक १.१०.२००६ ते दिनांक ३१.३.२०१० या दरम्यान शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत अथवा ज्यांचे शासन सेवेत कार्यरत असताना सदर कालावधी दरम्यान निधन झाले आहे त्यांच्याकडून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मंजूरीबाबतच्या अटींची पूर्तता झाल्यानंतर त्यांना वेतननिश्चितीचा प्रत्यक्ष लाभ हा फक्त निवृत्तीवेतन विषयक / कुटूंब निवृत्तीवेतन विपयक लाभांकरिताच म्हणजेच निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्ती वेतन, सेवानिवृत्ती उपदान/मृत्यू उपदान तसेच रजा रोखीकरण, या लाभ मंजुरीच्या प्रयोजनार्थ अनुज्ञेय राहील. संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांना दुसरा लाभ मंजूरीच्या अनुषंगाने थकबाकीची रक्‍कम अनुज्ञेय राहणार नाही.

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत स्पष्टीकरण – शासन निर्णय दि. ११ मे २०१७

विभागीय चौकशी/ न्यायालयीन प्रकरण प्रलंवित असलेल्या अविकारी/कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अमंलबजावणी करण्याची कार्यपध्दती

Leave a Comment