एकाकी पद आणि सुसेआप्रयो | isolated post For Maharashtra Government Employees

Photo of author

By Sarkari Channel

कालबध्द योजना  व सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना बददल ची माहिती आगोदरच देण्यात आली आहे. एकाकी पदांवरील कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ कसा देण्यात यावा. याबाबत शासन निर्णय दि.05/06/2010 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हया योजनेचे नामकरण सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना  म्हणून करण्यात आले व हि योजना दिनांक 1 ऑक्टोबंर 2006 पासून आमंलात आली आहे. साहव्या वेतन आयोगानुसार पी बी -3 ग्रेड पे 5400/-पर्यंत वेतन घेणाऱ्या अधि/कर्म यांना लागू करण्यात आली आहे. हि योजना संपूर्ण सेवा काळात देान वेळा देय ठरविण्यात आली आहे.

पहिला लाभ:-

या आगोदर ज्या योजनेमध्ये मंजूर करण्यात आलेले लाभ सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनाखालील पहीला लाभ ठरेल.या योजनेचा पहीला लाभ शासन निर्णय 31/08/2009 च्या आदेशांतील परिच्छेद 2(2) नुसार खालील तत्कत्यानुसार मंजूर करण्यात यावा.

अ.क्र.मूळ पदाचे ग्रेड वेतन (रुपये)मूळ पदाच्या/विद्यमान ग्रेडवेतना व्यतिरिक्त अनुज्ञेय ग्रेड वेतन (रुपये)
12000 पर्यंत200
22001 ते 4000300
34001 ते 5000400
45001 पेक्षा जास्त मात्र 5400 पर्यंत500

पहिल्या लाभासाठी गोपनीय अहवालांची सरासरी प्रतवारी “ब” पाहीजे.

एकाकी पदांना सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये शासन निर्णय दि. 06/09/2014 पासुन सुधारणा करण्यात आली आहे. हा आदेश दिनांक.06/09/2014 पासुन लागू करण्यात आला आहे.

पहिल्या लाभाअंतर्गत अनुज्ञेय करण्यात आलेल्या  ग्रेड वेतनाव्यतिरिक्त ग्रेड वेतनात रु.100 ची वाढ खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे.

अ.क्र.मूळ पदाचे ग्रेड वेतन (रुपये)मूळ पदाच्या/विद्यमान ग्रेडवेतना व्यतिरिक्त अनुज्ञेय ग्रेड वेतन (रुपये)
12000 पर्यंत200+100=300
22001 ते 4000300+100=400
34001 ते 5000400+100=500
45001 पेक्षा जास्त मात्र 5400 पर्यंत500+100=600

दुसरा लाभ:-

पहिल्या लाभानंतर 12 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यास खालील प्रमाणे दुसरा लाभ मंजूर करण्यात येते.

अ.क्र.पहिल्या लाभानंतरचे ग्रेड वेतन (रुपये)दुसऱ्या लाभांतर्गत अनुज्ञेय अतिरिकत ग्रेड वेतन (रुपये)
12000 पर्यंत300
22001 ते 4000450
34001 ते 5000600
45001 ते 5900 पर्यंत(मुळ पदाचे ग्रेड वेतन रु 5400+पहिल्या लाभांतर्गत अनुज्ञेय करण्यात आलेले ग्रेड वेतन रु.500 = 5900)700

दुसऱ्या लाभासाठी गोपनीय सरासरी ही “ब+” हवी.

दुसऱ्या लाभासाठी वेतनात रु.100 ची वाढ खालील प्रमाणे शासन निर्णय दि. 06/09/2014  नुसार करण्यात आलेली आहे.

अ.क्र.पहिल्या लाभानंतरचे ग्रेड वेतन (रुपये)दुसऱ्या लाभांतर्गत अनुज्ञेय अतिरिकत ग्रेड वेतन (रुपये)
12000 पर्यंत300+100=400
22001 ते 4000450+100=550
34001 ते 5000600+100=700
45001 ते 5900 पर्यंत(मुळ पदाचे ग्रेड वेतन रु 5400+पहिल्या लाभांतर्गत अनुज्ञेय करण्यात आलेले ग्रेड वेतन रु.500 = 5900)700+100=800

शासन निर्णय दि. 06/09/2014  च्या  शासन निर्णयातील संदिग्धता दुर करण्यासाठी शासन‍ निर्णय दि.10/02/2015 निर्गमित करण्यायत आला आहे.

एकाकी पदाचे वेतन
पूवी एकाकी पदाची कालबध्द पदोन्नती  देताना विशिष्ठ वेतन श्रेणी देत होते
पदोन्नतीची वेतन श्रेणी देताना आता मुळ वेतनात अतिरिक्त ग्रेड वेतन अनुज्ञेय
अ.क्र.मुळ ग्रेड वेतनपह‍िल्या लाभानंतरचे अत‍िर‍िक्त वेतनदुसऱ्या लाभानंतरचे अतिरिक्त वेतन
 शासन निर्णय05.07.201006.09.201405.07.201006.09.2014
12000 पेक्षा कमी200300300400
22001 ते 4000300400450550
34001 ते 5000400500600700
45001 ते 5900500600700800

उदा:- श्री कुलकर्णी हे दि.01.01.1995 मध्ये वाहन चालक म्हणुन सेवेत लागले आहे. वाहन चालक पद हे एकाकी आहे. दि.01.01.1995+12= 2007 रोजी 12 वर्ष पूर्ण होते.1900+200=2100 देय राहील. दुसरा लाभ हा दि.01.01.2007+12=01.01.2019 रोजी 12 वर्ष पूर्ण होते 2100+550=2650 देय होईल.

अटी व शर्ती हया शासन निर्णयात दिल्यानुसार राहील. विकल्प देता येईल.‍ वेतन नियम-1981 नुसार वेतन निश्च‍िती 11(1)(अ) नुसार करावी लागेल. रोजंदारीवरील,कंत्राटी तत्वावरील व तदर्थ नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही.

सातव्या वेतन आयोगमध्ये तील लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शासन निर्णय दि.02/03/2019 निर्गमित करण्यात आला आहे. व प्रत्यक्ष लाभ हा दि.01.01.2016 पासून लागू करण्यात येत आहे. ही 10,20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर देय राहील. या आगोदरच्या पोंस्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे. ती पाहण्यात यावी.

ज्या अधि/कर्म यांना दि.01.01.2016 पूर्वी पहीला व दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. अशा अधि/कर्म यांना खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार दुसरा व तीसरा लाभ अनुज्ञेय होतो. जे अधि/कर्म पूर्वीच्या योजनानुसार पहिला व दुसरा लाभ घेतला आहे. व दि.01.01.2016 पूर्वीच सेवानिवृत्ती /मृत्यु झाला आहे. त्यांना 12+8 व 24+6  याप्रमाणे सुआप्रयोजनेचा लाभ लागू होणार नाही.

दि.01.01.2016 पूर्वी 12 वा 4 वर्षाच्या सेवेनंतर घेतलेला लाभदुसऱ्या लाभाची अनुज्ञेयतातिसऱ्या लाभाची अनुज्ञेयता
पहीला लाभपहिल्या लाभापासून आठ वर्षा नंतर (12+8)दुसऱ्या लाभापासून दहा वर्षा नंतर (12+8)
दुसरा लाभलागू नाहीदुसऱ्या लाभापासून सहा वर्षा नंतर (24+6)

उदा:- श्री कुलकर्णी यांचे उदाहरण आपण घेतले होते.  पुढे पाहुया. श्री कुलकर्णी यांना दुसरा लाभ हा 01.01.2019 रोजी दुसरा लाभ देण्यात आला आहे. तील लाभाची सु आ प्र योना ही 01.01.2016 पासुन आमलांत आल्या असल्यामुळे श्री कुलकर्णी यांना दुसरा लाभ हा पहीला लाभापसुन म्हणजे 01.01.2007+8=01.01..2015  होईल. पण शासन निर्णय हा दि.01.01.2016 रोजी आमलांत आणल्यामुळे त्यांचा सुधारीत लाभ हा 01.01.2016 पासून वेतनस्तर एस-8 मध्ये देय होईल. तीसरा लाभ हा दि.01.01.2016+8=01.01.2024 पासून वेतनस्तर एस-9मध्ये देय होईल.

परिशिष्ट.
शासन निर्णय, वित्त विभाग, क्र:वेतन 1119/प्र.क्र.3/सेवा-3, दिनांक 02/03/2019 
अधिकारी व कर्मचारी याांच्यासाठी सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना (से.आ.प्र.यो.)
 1 दि. 01.01.2019 वा त्यानांतर शासन सेवेत / जिल्हा परिषदेत / अनुदानित सांस्थेत रुजू झालेल्या प्रकरणी
 2 विभागात पदोन्नतीची वेतन श्रेणी नसलेल्या, एकमेव संवर्ग असलेल्या पदावरील प्रकरणी
 3 विभागात पदोन्नतीची वेतन श्रेणी नसलेल्या,  एकमेव पदावरील प्रकरणी
 कोणत्या वेतन श्रेणीत नियुक्तीसेआप्रयो अंतर्गत अनुज्ञेय वेतन श्रेणीसेआप्रयो अंतर्गत अनुज्ञेय वेतन श्रेणीसेआप्रयो अंतर्गत अनुज्ञेय वेतन श्रेणी
 
 सुरवातीसनियुक्तीपासून 10 वर्षाच्या सेवेनंतरनियुक्तीपासून 20 वर्षाच्या सेवेतनंतर किंवा मागील पदोन्नतीच्या तारखेपासून 10 वर्षाच्या सेवेतनंतरनियुक्तीपासून 30 वर्षाच्या सेवेतनंतर किंवा मागील पदोन्नतीच्या तारखेपासून 10 वर्षाच्या सेवेतनंतर
अ.क्र.    
12345
1एस-1एस-2एस-3एस-4
2एस-2एस-3एस-4एस-5
3एस-3एस-4एस-5एस-6
4एस-4एस-5एस-6एस-7
5एस-5एस-6एस-7एस-8
6एस-6एस-7एस-8एस-9
7एस-7एस-8एस-9एस-10
8एस-8एस-9एस-10एस-11
9एस-9एस-10एस-11एस-12
10एस-10एस-11एस-12एस-13
11एस-11एस-12एस-13एस-14
12एस-12एस-13एस-14एस-15
13एस-13एस-14एस-15एस-16
14एस-14एस-15एस-16एस-17
15एस-15एस-16एस-17एस-18
16एस-16एस-17एस-18एस-19
17एस-17एस-18एस-19एस-20
18एस-18एस-19एस-20एस-21
19एस-19एस-20एस-21लागू नाही
20एस-20एस-21लागू नाहीलागू नाही

गोपनीय अहवाल प्रतवारीच्या सरासरीचा निकष सामान्य प्रशासन विभागाने विहीत केलयाप्रमाणे राहील. शासननिर्णय दि.01.08.2019 पाहवा.

रोजंदारीवरील,कार्यव्ययी आस्थापनेवरील, कंत्राटी तत्वावरील व तदर्थ नियुक्त करण्यात आलेल्या अधि/कर्म यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय करता येणार नाही.

शासन निर्णय दि.23/12/2015 नुसार “गोपनीय अहवालांची ही सरासरी प्रतवारी प्राप्त न केल्यास तसेच, कर्गचारी वैद्यकीय अथवा अन्य कारणास्तव अपात्र ठल्यास त्याला मंजूर करण्यात आलेला आलेला यथास्स्थती पहील  अथवा दुसरा लाभकाढून घेण्यात येईल, मात्र रदद केलेल्या लाभाची वसूली करण्यात येऊ  नाही”.

शासन निर्णय दि. 10/12/2015 नुसार गट ड पदांना गोपनीय अहवाल सरासरी प्रतवारीची तरतुद रदद करण्यात आली आहे

Leave a Comment