तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

Photo of author

By Sarkari Channel

कालबध्द योजना व सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना हया दोन योजना संपूर्ण सेवा कालावधीत एक लाभाच्या योजना होती व मूळ नियुक्तीपासुन 12 वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर व पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आली. सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लाभाची योजना आहे.यामध्ये पहीला लाभ 12 वर्षानंतर मिळत होता. दुसरा लाभ हा पहीला लाभाच्या 12+12=24 वर्षानंतर मिळतो. पात्रतेच्या निकषानुसार मिळतात.

वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार 7 व्या वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शासन निर्णय दि. 02/03/2019 निर्गमित करण्यात आला आहे. ( शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गंत  आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे.)त्यामध्ये 10,20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना हि दिनांक 01.01.2016 पासुन आमलांत आण्यात आली आहे.

साहव्या वेतनाच्या 5400/- ग्रेड पे आणि सातव्या वेतन आयोगाचा वेतन स्तर एस-20 पर्यंत मर्यादीत करण्यात आली आहे. महणजे 5400/- ग्रेड पे अधि/कर्म 6600/- ग्रेड पे सातव्या वेतनानुसार एस-20 वरुन स्तर एस-23 मध्ये आप्रयो देय राहील. परंतु 5500/-ग्रेड पे व 7 व्या वेतन आयोगानुसार स्तर एस-21 मध्ये वेतन घेणाऱ्या अधि/कर्म यांना नवीन योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

संपूर्ण सेवा काळात तीन वेळा या योजनेचा लाभ देण्यात येतो. तीन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या वर एकही लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अटी व शर्ती हया पदोन्नतीच्या नियमानुसार राहील. विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे बाबत शा नि. दि. 15.12.2017 नुसार कार्यवाही करण्यात यावी.

ज्या अधि/कर्म यांना दि.01.01.2016 पूर्वी पहीला व दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. अशा अधि/कर्म यांना खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार दुसरा व तीसरा लाभ अनुज्ञेय होतो. जे अधि/कर्म पूर्वीच्या योजनानुसार पहिला व दुसरा लाभ घेतला आहे. व दि.01.01.2016 पूर्वीच सेवानिवृत्ती /मृत्यु झाला आहे. त्यांना 12+8 व 24+6  याप्रमाणे सुआप्रयोजनेचा लाभ लागू होणार नाही.

दि.01.01.2016 पूर्वी 12 वा 4 वर्षाच्या सेवेनंतर घेतलेला लाभदुसऱ्या लाभाची अनुज्ञेयतातिसऱ्या लाभाची अनुज्ञेयता
पहीला लाभपहिल्या लाभापासून आठ वर्षा नंतर (12+8)दुसऱ्या लाभापासून दहा वर्षा नंतर (12+8)
दुसरा लाभलागू नाहीदुसऱ्या लाभापासून सहा वर्षा नंतर (24+6)

गोपनीय अहवाल प्रतवारीच्या सरासरीचा निकष सामान्य प्रशासन विभागाने विहीत केलयाप्रमाणे राहील. शासननिर्णय दि.01.08.2019 पाहवा.

रोजंदारीवरील,कार्यव्ययी आस्थापनेवरील, कंत्राटी तत्वावरील व तदर्थ नियुक्त करण्यात आलेल्या अधि/कर्म यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय करता येणार नाही.

टीप- मुळ शासन निर्णय पाहण्यात यावा. काही शासन निर्णय साहव्या वेतन आयोगाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनामध्ये देण्यात आले आहे. ते पाहावे.

Leave a Comment