बदली प्रवास भत्ता | transfer travel allowance

Photo of author

By Sarkari Channel

भाग – तीन

 बदली प्रवास भत्ता हा मुंबई नागरी सेवा नियम 1959 मधील नियम 488 ते 532 नुसार दिला जातो.शासन निर्णय दि.03. 03.2010 नुसार बदली प्रवास भत्या मध्ये बदल करण्यारत आले आहे. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचे कुटूंबिय त्याला अनुज्ञेय असलेल्या श्रेणी/वर्गाने प्रवास करण्यास पात्र आहेत.  प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्यास कर्मचाऱ्यास बदली प्रवास भत्ता अनुज्ञेय आहे.बदली प्रवास भत्यामध्ये प्रामुख्याने तीन बाबीचा समावेश होतो. 1.कर्मचारी व त्यांच्या, कुटुंबियांचा प्रवास भत्ता  2.संयुक्ती बदली अनुदान 3. सामान वाहतुकीचा खर्च / वाहन वाहतुकीचा खर्च.प्रवासाचे आंरभ स्थान मुख्यालयातील राहत्या घरापासून आरंभ होऊन नवीन मुख्यालयातील राहत्या घराजवळ संपतो असे गृहीत धरले जाते. बदली नंतरच्या प्रवास भत्याच्या मागण्या प्रवास पूर्ण झाल्यापासून 6 महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

अ) कुटूंबाची व्याख्या

1) म.ना.से.(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 मधील नियम 9(16) नुसार 2)पती / पत्नी, 2) औरस मुले व सावत्र मुले, दत्तक मुले, 3) आई, वडील, बहीन, अज्ञान भाऊ  4)15सप्टेंबर 2000 पासुन दोन मुलांचा समावेश असेल व त्यापुर्वी दोन मुलांची अट लागू राहणार नाही.5) घटस्पोटीत, विधवा, अविवाहीत, परितक्त्या, पतीपासुन वेगळी व पालकासोबत राहणाऱ्या मुली यांचा कुटूंबामध्ये समावेश होतो. विधवा बहीन, यांचा कुटूंबामध्ये समावेश होतो. सावत्र आई, यांचा कुटूंबामध्ये समावेश होतो.  ६)अवलंबीत व्यक्ती म्हणजे – (रु.3500) मुळ निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ याच्या एकत्रीत रकमेपेक्षा कमी असेल असा कुटूंबाचा सदस्य.  सातव्या वेतन आयोगानुसार प्रवास या बदली भत्ता यामध्ये सुधारणा करण्यात आली नाही. लवकरात लवकर शासन निर्णय निघु शकतो.

ब) बदली निमित्त खाजगी/भाडयाच्या वाहनाने प्रवास(नियम 490)

शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांचे  कुटूंब यांचा रेल्वे टिकीट / बस टिकीट / खाजगी वाहनाने प्रवास (कि.मी. भत्याच्या रकमेशी सिमीत करुन) मंजुर करण्यात येईल.दोन्ही ठिकाणे रेल्वेने जोडली असल्यास मात्र आलेला खर्च हा त्या मार्गावर रेल्वेच्या उपलब्ध असलेल्या अनुज्ञेय वर्गाच्या भाडयांशी सिमित करुन देण्यात येईल)

क)संयुक्त बदली अनुदान

शासन निर्णय दि.06.01.2006 व दि.03.03.2010 नुसार शासकीय कर्मचाऱ्याची बदली झाल्यावर त्याला खालील तक्यात नमूद केलयाप्रमाणे संयुक्त बदली अनूदान मंजूर करण्यात येईल. त्यासाठी बदलीनंतर त्याच्या निवासस्थानात बदल झाल्यानंतर प्रत्यक्ष निवासाच्या ठिकाणात बदल झाला तरच संयुक्त अनुदान मिळेल.

अ.क्र.बदलीचा प्रकारसंयुक्त बदली अनुदानाचा दर.
1त्याच मुख्यालयात(बेसीक+ग्रेड वेतन) च्या 1/3 इतकी रक्कम
2नवीन व जुन्या मुख्यालयातील अंतर 20 कि.मी. पेक्षा कमी. (बेसीक+ग्रेड वेतन) च्या 1/3 इतकी रक्कम
3नवीन व जुन्या मुख्यालयातील अंतर20 कि.मी. वा त्यापेक्षा अधीक असल्यास(बेसीक+ग्रेड वेतन) च्या 1/2 इतकी रक्कम

कर्मचाऱ्यांना बदली निमित्तच्या प्रवासासाठी मिळणारा दैनिंक भत्ता व मुंबई नागरी सेवा नियम,1959 मधील तरतुदीनुसार अनुज्ञेय असलेला बदलीनिमित्तच्या अनुषंगिक प्रवासाचा(जुन्या व नव्या मुख्यालयाच्या ठिकाणचे निवास स्थान आणि रेल्वे स्टेशन/बस स्थानक/विमानतळ या दरम्यानच्या प्रवासाचा किंवा त्याच मुख्यालयीच्या बदलीनंतरच्या प्रवासाचा) खर्च यापुढेही वेगळा अनुज्ञेय ठरणार नाही.

क)वैयक्तिक सामानाच्या वाहतूकीसाठी अनुज्ञेयता

1) रेल्वे वाहतूक:-

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे वैयक्तिक सामान स्वत:च्या जोखमीवर खालील तक्त्यातील रकाना 3 मध्ये दर्शविलेल्या मर्यादेपर्यंत मालगाडीने वाहून नेण्याचा प्रत्यक्ष खर्च मिळण्यास पात्र राहील.

श्रेणीशासकीय कर्मचारी धारण करीत असलेल्या पदाचे ग्रेड वेतनरेल्वे
प्रथम श्रेणीअ) रु. 8900/- व त्याहुन अधीकमालगाडीने 6000 कि.ग्रॅ., 4 चाकी  पुर्ण वॅगन, 1 दुहेरी कंटेनर.
ब) रु. 6600/- ते रु. 8900/-मालगाडीने 6000 कि.ग्रॅ., 4 चाकी  पुर्ण वॅगन,1 एकेरी कंटेनर.
व्दितीय श्रेणीअ) रु. 5400/- ते रु. 6600/-मालगाडीने 6000 कि.ग्रॅ., 4 चाकी  पुर्ण वॅगन,1 एकेरी कंटेनर.
ब) रु. 2800/- ते रु. 5400/-मालगाडीने 6000 कि.ग्रॅ.
तृतीय रु. 2800/- पेक्षा कमीमालगाडीने 1500 कि.ग्रॅ.

2)रस्त्याने वाहतूक

दोन्ही ठिकाणे रेल्वेने जोडलेली असताना, शासकीय कर्मचाऱ्यांने वैयक्तिक सामान रत्याने वाहून नेल्यास वैयक्त‍िक सामानाच्या वाहतूकीचा प्रत्यक्ष खर्च किंवा मालागाडीने वाहतुकीसाठी अनुज्ञेय असलेल्या खर्चाच्या 25 टक्के वाढीव रक्कम यापैंकी जे कमी असेल ते देय ठरते.

शासकीय कर्मचारी धारण करीत असलेल्या पदाचे ग्रेड वेतनअ/अ-1/ब-1 वर्ग शहरे
(रु.प्रती किलोमिटर)
इतर शहरे
(रु.प्रती किलोमिटर)
रु. 5400/- व त्यापेक्षा अधीक48.0030.00
रु. 4400 ते रु. 5400/-24.0015.00
रु. 4400 पेक्षा कमी12.007.50

टीप- स्तंभ-2 मधील किलोमीटर भत्याचा उच्च दर अ-1/अ/ब-1 शहरांच्या(शा.नि. दि.17/06/2005 च्या वर्गीकरणानुसार) हददीत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वैयक्तिक सामानाची वाहतूक केल्यास अनुज्ञेय आहे.

4) वाहतूक भत्ता:-

वाहनांच्या वाहतूकीसाठीचे दर खालीलप्रमाणे ठरविण्यात आले आहे अ) मोटरकार – 5.00 रु. प्रती कि.मी. ब) मोटर सायकल / स्कुटर – 1.60 पैसे प्रती कि.मी. क) मोपेड / लुना – 0.80 पैसे प्रती कि.मी. ड) सायकल – 0.50 पैसे प्रती कि.मी. (शासन निर्णय दि. 03.03.2010 मधील अनुक्रमांक 5) ज्या ग्रेड वेतनाच्या समोर किलोमीटर भत्त्याचे दर दर्शविण्यात आलेत त्या ग्रेड वेतन मर्यादेतील अधिकारी त्या प्रकारचे वाहन बाळगण्यास पात्र समजण्यात येते. या तरतुदीनुसार वाहन बाळगण्यास प्रकारांपैकी एका वाहनाच्या वाहतूकीचा खर्च अनुज्ञेय राहील.

ड) बदली होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांस अनुज्ञेय वर्गाचे अतिरिक्त भाडे:-

बदलीनंतर नव्या मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय निवासस्थान न मिळालयामुळे कुटुंब जुन्याच मुख्यालयी ठेवल्याच्या प्रकरणी,नवीन मुख्यालयात रुजू हेाण्याच्या दिनांकांपासून 6 महिन्यांच्या आत सर्वसाधारण बदली प्रवास भत्याशिवाय,नविन मुख्यालय ते जुने मुख्यालय या दरम्यान जाता-येतांनाच्या दोन्ही प्रवासासाठी अनुज्ञेय वर्गाचे अतिरिक्त भाडे दयावयाची सवलत लागू राहील.

इ)दुसऱ्या शासनाकडील बदली (नियम 506-बी):-

दुसऱ्या शासनाकडे तात्पुरत्या बदलीनंतर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्या शासनाकडील पदावर रूजू होण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी द्यावयाच्या प्रवास भत्याच्या बाबतीत त्यांनी प्रवास भत्याची मागणी,उसनवारीवर घेणाऱ्या शासनाच्या नियमानुसार किंवा या राज्य शासनाच्या नियमानुसार विनियमित करण्याबाबतचा विकल्प देण्याची तरतूद चालू ठेवण्याता आली आहे.

 • नियम क्रमांक 495 अन्वये पती/पत्नी यांची एकाच वेळी 6 महिन्याच्या अंतराने एकाच ठिकाणी बदली झाल्यास दोघापैंकी एकास बदली प्रवास भत्त्याचा लाभ अनुज्ञेय राहील.
 •  एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर बदली प्रवासासाठी फक्त एकाच पत्नीस प्रवासभत्ता व दैनिकभत्ता अनुज्ञेय आहे.
 • उमेदवाराची प्रशिक्षण काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तर त्यास बदली प्रवासभत्ता अनुज्ञेय आहे.
 • बदली प्रवास भत्ता देयकात जुन्या ठिकाणी कार्यभार कधी हस्तांतरीत केला ती तारीख व नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यभार कधी धारण केला ती तारीख नमुद करणे (मकोनी-24 व 153(३)). 
 • जेव्हा कर्मचाऱ्यांचे सामान ट्रकने जुन्या ठिकाणापासून नविन ठिकाणी नेले जाते तेव्हा वाहतूक कंपनीची पैसे मिळाल्याबददची मुद्रांकित पावती देयकाला जोडलेली आहे. या पावतीमध्ये प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या सामानाचे वजन नमूद करावी. 
 • बदलीमुळे जर कर्मचाऱ्याच्या राहण्याच्या जागेत(निवास स्थान) बदल होत नसेल तर बदली अनुदान देय नाही. 
 • कमी अंतराच्या व स्वस्त मार्गाने प्रवास केला नसल्यास याची कारणे देयकात नमूद करुन सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजूरी जोडण्यात यावी.(मुंबई नागरी सेवा नियम 397(अ) व 490) 
 • बदली लोकहित व प्रशासकीय कारणास्तव केली असल्याचे प्रमाणपत्र/आदेश स्वाक्षांकित करुन जोडणे(नियम -488) सामान वाहतूकीचे रेल्वे दर स्वत:च्या जोखमीवर नसल्याने 25 टक्के मागणी अनुदेय नाही.(शा.नि. दि.10.09.1985) 
 • रु. 500/- वरील भाडे पावतीवर रक्कम घेणाऱ्याची रु. 1/- चे महसूल मुद्रांकावर स्वाक्षरी आहे.(म.को.नि. 16 व 182) 
 • कर्मचाऱ्यांचे बदली प्रवास देयकांत स्वत:साठी अतिरिक्त प्रवास भत्याची मागणी का केली आहे याचे कारण देयकात नमूद करणे गरजेच आहे. अतिरिक्त प्रवास भाडयाची सवलत फक्त एकदाच अनुज्ञेय आहे.
 • बदलीच्या ठिकाणी स्वत:च्या वाहनाने स्वत: कुटंबाने केलेल्या प्रवासाबददल सडक भत्ता/रोड किलोमीटरची मागणी योग्य दराने आकारावी(मु.ना.से.नि .490(अ)चा (2) टिप-3 व शा.नि.दि.03.03.2010) 
 • राहण्याचे ठिकाण महाराष्ट्र राज्याबाहेरील असल्यास महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास खर्च अनुज्ञेय आहे.(मुं.ना.से. नि. 506(ड) रिक्षा/टॅक्सी आकार प्रवास भत्ता देयकात नमूद करावा.) 
 • सामान,खुष्कीच्या मार्गाने वाहतूक केल्यास सामान वाहतूकीचे रेल्वेचे प्रति वॅगन किंवा प्रति क्विंटल रेल्वे प्रशासन दर प्रत बदली प्रवास देयकाला जोडण्यात यावी. 
 • प्रवास भता व बदली प्रवास साची आवश्यक तपासणी सूची

Leave a Comment