एनपीएस धारक असल्यास आयकर मधून अतिरिक्त सूट देण्यात येते. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा आपापल्या कार्यालयाकडून आयकर कपात करण्यात येते. आपले आयकर रक्कम नियमानुसार कपात केली आहे का ते पाहावी. जे आयकर सूट नियमानुसार आपल्याला मिळते ती देण्यात येत आहे का? एनपीएस धारक असल्यास अतिरीक्त सूट देण्यात आली आहे का? हे पाहावे.
हे अधिकारी व कर्मचारी यांची सुद्धा जबाबदारी आहे. फक्त डीडीओ ला दोष देऊ नये. प्रत्येक कार्यालयाकडून फॉर्म -16 हा अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात येते. तेव्हा तो योग्य भरण्यात आला आहे का? काही चूकीची रक्कम दाखविण्यात आली नाही ना? नियमानुसार सूट देण्यात आली आहे का? हे सर्व पाहावे. कार्यालयातून दिलेल्या फॉर्म – 16 मध्ये चूका असेल तर त्या दुरूस्त करुन घ्याव्या. त्यानंतर आयकर रिटर्न्स भरण्यात यावे.
एनपीएस मध्ये तीन प्रकारे आयकर सूट मिळते.
1.80C, 80CCC व 80 CCD(1)(Employee`s/Self-employed contribution towared NPS) :-
या तीन्हीमध्ये रु. 150000 पर्यंत सूट मिळते. 80 सी मध्ये जीपीएफ,पीपीएफ व एलआयसी इ. मध्ये सूट मिळते. तसेच 8सीसीसी मध्ये निवृत्ती फंडमध्ये गुंतवणूक केली की सूट मिळते. व 80 सीसीडी1 यामध्ये शासकीय कर्मचारी यांच्या वेतनातून (बेसीक+डीए) 10 टकके कपात करण्यात येते. जेवढी कपात करण्यात येते तेवढी सूट मिळते. परंतू ती रु.150000/- पेक्षा जास्त नसावी. 80C, 80CCC व 80 CCD1 मिळून दीड लाख सूट मिळते.
2.80CCD(1B) (Additional Contribution towards NPS):-
या कलमनुसार 50000 हजार रुपयांच्या अतिरिक्त कर कपातीची तरतूद करण्यात आली आहे. कर्मचारी तसेच स्वयंरोजगारासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. कलम 8CCD अंतर्गत कमाल 2 लाख रुपयांची कर कपात करण्यात येते/येऊ शकते. यामध्ये कलम 80CCD(1) अंतर्गत रु. 1.5 लाख आणि कलम 80CCD(1B) अंतर्गत रु. 50000/- हजाराची अतिरिक्त वजावट घेता येते. म्हणजे 2 लाखापर्यंत सूट प्राप्त करता येऊ शकते.
3.80 CCD(2) (Employer`s contribution towards NPS):-
शासकीय कर्मचारी यांच्या वेतनातून (बेसीक+डीए) 10 टकके कपात करण्यात येते. व शासनाकडून 14 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यास 80 सीसीडी2 मध्ये सूट देण्यात येते. 14 टकके सूट फक्त केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यास देण्यात येत होती.आता राज्य शासकीय कर्मचारी यास देण्यात येते.
आपण उदाहरण घेऊन समजूया.येथे नियोक्ताची(Employee`s) रक्कम ही 50000/- हजार घेण्यात आली आहे.
उदा:-I) अ अधिकारी/कर्मचारी यास 1.80C मध्ये रु.150000/- 2.80CCC मध्ये रु.0/- व 80 CCD(1) मध्ये रु. 50000 ( इथे शुन्य 0 घ्यावे)गुंतवणूक करण्यात आली आहे. एकूण दोन लाख गुंतवूणक केली असली तरीही तीन्ही मिळून दीड लाख सूट मिळते. 80 सी मध्येच दीड लाख सूट मिळते. जी 80 CCD(1) मध्ये रु. 50000 गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याची सूट ही 80CCD(1B) मध्ये रु.50000 हजारपर्यंत सूट प्राप्त करता येते. ही अतिरीक्त सूट असते. 80CCD(1B) सूट घेतांना एनपीएस मधील टायर-1 मध्ये गुंतवणूक करण्यात आली पाहिजे. 80 CCD(2) मध्ये जी काही 14 टक्के रक्कम कपात करण्यात आली तेवढी सूट मिळेल.
II) उदा:- ब अधिकारी/कर्मचारी यास 1.80C मध्ये रु.110000/- 2.80CCC मध्ये रु.20000/- व 80 CCD(1) मध्ये रु. 20000 (इथे वीस हजार रुपये राहू दयावे) गुंतवणूक करण्यात आली आहे. ती दीड लाख झाली आहे. 80 CCD(1) मध्ये जी पन्नास हजार रुपये गुंतवूणक केली आहे. त्यातील 20 हजार रुपये सुरवातीस दाखवावे व नंतरची रक्कम ही जी तीस हजार रुपये उरलेले आहे. त्याची सूट ही 80CCD(1B) मध्ये घेता येते. (रु.50000 हजारपर्यंत सूट प्राप्त करता येते) ही अतिरीक्त सूट असते. 80CCD(1B) सूट घेतांना एनपीएस मधील टायर-1 मध्ये गुंतवणूक करण्यात आली पाहिजे. 80 CCD(2) मध्ये जी काही 14 टक्के रक्कम कपात करण्यात आली तेवढी सूट मिळेल.
दोन्ही उदाहरणावरुन आपणास समजले असेल की 80CCD(1B) मध्ये सूट कशा पध्दतीने प्राप्त करता येते.
Whether opting for taxation under Section 115BAC? या मध्ये yes or no असे येईल. तर जुना slab घ्यायचा असेल तर No म्हणा व नविन Slab घ्यायचा असेल तर Yes म्हणा.
*Income tax Return येथे भरु शकता. Income tax return ची website ची Link येथे देण्यात आली आहे.
आयकर रिटर्न्स आता सर्व अधिकारी /कर्मचारी हे स्वत: भरु शकतात. शासकीय कर्मचारी यांनी आयटीआर-1 भरावे. पंरतू खूप अधिकारी / कर्मचारी हे SIP पैसे मध्ये गुंतवणूक करतात. Income tax site गेल्यानंतर Services मध्ये Annual Information Statement(AIS) मध्ये जावून आपली माहिती घ्यावी. तेथे sale of Securities and units of mutual fund दाखवत असेल तर आटीआर-2 व 3 मधून रिटर्न्स भरण्यात यावे.
सर्वांना विनंती आहे की, आपली माहिती लपवू नका आता आयकर विभाग खूप सतर्क झाले आहे. माहिती अचूक देण्यात यावे. आयकर रिटर्न्स योग्य पध्दतीने भरण्यात यावे. तुमच्या आधार कार्ड व पॅन लिंक मुळे सर्व माहिती ही आयकर विभाग मिळते. हे लक्षात ठेवावे.
Disclaimer:- ही माहिती पूर्ण माहिती घेऊन देण्यात आली आहे. तसेच काही समस्या असेल तर आपल्या CA किंवा आयकर वकीलांना भेटावे.