भाग – एक
प्रस्तावना:- शासकीय सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्टया कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावण्या-या आर्थिक आपत्तीत कुटुंबिंयांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने सन 1976 साली प्रथमित: अनुकंपा नियुक्तीची योजना लागू केली. या योजनेमध्ये शासन निर्णय दि. 26.10.1994 अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतची सुधारित नियमावली विहीत करण्यात आली आहे. त्यांनतर त्यामध्ये नविन शासन निर्णय,परिपत्रक निर्गमित झाले आहे. यासर्वचा येथे विचार करणार आहोत. अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील तरतुदी ह्या केवळ शासकीय कर्मचाऱ्यापूरत्याच सीमित आहेत. सदर तरतुदी ह्या जिल्हा परिषद/नगरपालीका/महानगरपालिका/महामंडळे / प्राधिकरणे /व्यापारी उपक्रम इतर तत्सम आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.
*शासन निर्णय दि. 11/09/2019 नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पद भरतीच्या मर्यादेबाबत.
1) अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतूदी खालीलप्रमाणे आहेत:-
(1) अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ खालील शासकीय कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुज्ञेय राहील:-
(अ) शासकीय कर्मचाऱ्यांना (रुपांतरीत स्थायी व अस्थायी आस्थापनेवरील शासकीय कर्मचारी धरून) (शासन निर्णय दि. 26.10.1994)
(आ) सेवा नियमित केलेल्या परंतु अनिसंख्य पदावर कार्यरत असलेले कर्मचारी. (शासन निर्णय दि. 10.7.2009)
(2) शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या पात्र नातेवाईकांना खालील नमूद परिस्थितीत अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू राहील:-
(अ) शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय दि. 22.08.2005)
(आ) गट अ/ब/क/ड मधील शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास नक्षलवादी/ आतंकवादी/ दरोडेखोर/समात विघातक यांच्या हल्यात/कारवाईत मृत्यू आल्यास अथवा शासन सेवेत कार्यरत असतांना स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातील पात्र व्यक्तीस, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना, त्यांचे नाव अनुकंपाधारकांच्या सामान्य प्रतीक्षासूचीमध्ये न घेता, त्यांची वेगळी यादी करुन पद उपलब्ध असल्यास, रिक्त पदांच्या 5 टक्के मर्यादेची ( 10 टक्के- शासन निर्णय दि. 1 मार्च 2014) अट शिथील करुन त्यांना सर्वं प्राथम्याने अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. (शासन शुध्दीपत्रक दि. 17.09.2012) *शासन निर्णय दि. 11/09/22019 नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पद भरतीच्या मर्यादेबाबत.
(इ) गट अ/ब/क/ड मधील शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास नक्षलवादी/ आतंकवादी/दरोडेखोर/समात विघातक यांच्या हल्यात/कारवाईत कायमस्वरुपी जायबंदी झाले आहेत व त्यांनी स्वत:हून शासकीय सेवा सोडून देण्याची लेखी अनुमती दिली आहे अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियातील एका व्यक्तीस अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या 5 टक्के ( 10 टक्के- शासन निर्णय दि. 1 मार्च 2014) मर्यादेमध्ये प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी. (शासन निर्णय दिनांक 17.7.2007)
(3) खालील दर्जाच्या पदावर अनुकंपा नियुक्ती देय राहील :-
(अ) राज्य शासनांतर्गत कोत्याही गट-क आणि गट-ड मधील सरळ सेवेच्या पदांवर त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील विहीत शैक्षणिक अर्हता असल्यास अशी नियुक्ती देता यईल.( शासन निर्णय दि. 26.10.1994 व शासन निर्णय दि. 28.03.2001)
(आ) ह्या नियमानुसार नियुक्ती मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेस बसण्याची आवश्यकता नाही तसेच सदर पदावर अनुकंपा नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा चा सल्ला घेण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मोटार वाहन उप निरीक्षक, रेंज वन अनिकारी, कनिष्ठ अभियंता, सहायक वैद्यकीय अधिकारी, इ. गट-‘क’ मधील कार्यकारी (एस्क्झक्युटीव) पदावर तसेच मंत्रालयातील सहायक पदावर नियुक्ती देता येणार नाही तसेच विधीमंडळाचा सल्ला घेणे आवश्यक नाही. ( शासन निर्णय दि. 26.10.1994 व दि. 21.11.1997)
(इ) लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदाखेरीज अन्य गट-‘क’ मधील कार्यकारी पदांवर नियुक्ती देण्यात यावी. मात्र अशी नियुक्ती ही त्या पदांसाठी सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा भरतीची तरतुद आहे अशाच पदांवर देण्यात यावी. ( उदाहरणादाखल काही कार्यकारी पदांची यादी-परिशिष्ट्ट क ) (शासन निर्णय दि. 20.12.1996)
(4) अनुकंपा नियुक्तीक्तीसाठी पात्र कुटुंबिय:-
- (अ) अनुकंपा तत्वावरील ननयुक्तीसाठी खालील नमूद केलेले नातेवाईक पात्र राहतील व त्यापैकी एका पात्र नातेवाईकास नियुक्ती अनुज्ञेय राहील.
- (1) पती/पत्नी,
- (2) मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत),मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत)
- (3) दिवंगत शासकीय कर्मचा-याच्या बाबतीता हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून
- (4) घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण,
- (5) केवळ दिवगंत अविवाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण (शासन निर्णय दि. 26.10.1994 व दि.17.11.2016)
- (आ) मृत अधिकारी/कर्मचा-यांच्या पती/पत्नी ने कोणाची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करावी याबाबत नामांकन देणे आवश्यक राहील. मृत अधिकारी/कर्मचा-यांचे पती/पत्नी हयात नसल्यास त्याच्या/तिच्या सर्व पात्र कुटुंबियांनी एकत्रित येऊन कोणाची नियुक्ती करावी याबाबत नामांकन करावे. (शासन निर्णय दि. 17.07.2007)
(5) कुटुंबाची हलाखीची परिस्थिती:-
- (अ) अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरिता मासिक उत्पन्नाची तसेच ठोक रकमेची मर्यादा यापुढे राहणार नाही. (शासन निर्णय दि. 26.10.1994)
- (आ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना असे प्रस्ताव शासन सेवेतील रोजगारावर असलेली मर्यादा,या योजनेच्या मागील भूमिका लक्षात घेऊन जो कर्मचारी मृत झाला आहे त्याच्या कुटुंबियांना तात्काळ उध्दभवा-या आर्थिक पेचप्रसंगावर मात करण्याच्या उद्देशाने विचारात घ्यावेत.(शासन निर्णय दि. 26.10.1994)
- (इ) दिवगंत शासकीय कर्मचा-याचा नातेवाईक पूर्वीच सेवेत असतेल तथापी तो त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आधार देत नसेल तर अशा प्रकरणात त्या कुटुंबाची आर्थिक परिस्स्थिती हालाकीची आहे किंवा कसे हे ठरवंताना नियुक्ती प्राधिका-यांनी अत्याधिक दक्षता घ्यावी,जेणेकरुन सेवेत असलेला सदस्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत नाही. या नांवाखाली अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा दुरुपयोग केला जाणार नाही.यासंदर्भात नियुक्ती प्राधिका-याने मिळणा-या निवृतीवेतनाची रक्कम, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, त्याची मालमत्ता/दायित्व, गंभीर आजारामुळे अथवा अपघातामुळे मृत झाला असल्यास त्यासाठी करण्यात आलेला वैद्यकीय खर्च, कुटुंबातील मिळवत्या व्यक्ती इत्यादी बाबी विचारात घेणे अपेक्षीत आहे. (शासन निर्णय दि. 26.10.1994)
(6) लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र :-
दिनांक 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही. (शासन निर्णय दि. 28/3/2001)
(7) योजनेची माहिती देण्याची जबाबदारी :-
- (अ) आस्थापना अधिका-याने अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या योजनेची माहिती (योजनेचा उद्देश, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षनिक अर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत,अर्ज विहीत नमून्यात भरणे इ. माहिती) शासकीय कर्मचा-याच्या मृत्यूनंतर 15 दिवसानंतर किंवा कुटुंबनिवृत्तीवेतनाची कागदपत्रे पाठवितांना शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबियांना त्वरीत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.तसेच सदर माहिती मिळाल्याबाबत कुटुंबाकडून पोच घेणे आवश्यक आहे. (शासन निर्णय दि. 23.08.1996 व शासन परिपत्रक दि.5.2.2010)
- (ब) दिवगंत शासकीय कर्मचा-याचा पात्र वारसदार सज्ञान नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करु शकेल मात्र तो सज्ञान झाल्यावर त्याने असा अर्ज करणे अपेक्षीत आहे. हे देखील कुटुंबनिवृत्तीवेतन धारकाला कुटुंब निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रांची पूर्तता करतेवेळी लेखी कळवणे संबंधित आस्थापना अधिकाऱ्यावर बंधनकारक राहील. (शासन निर्णय दि. 20.05.2015)
(8) कुटुंबातील अन्य सदस्यांचा सांभाळ करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र:-
- (अ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबंधितांकडून कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. (शासन निर्णय दि. 23.08.1996)
- आ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबंधीताकडून दिवगंत कर्मचा-यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. भविष्यामध्ये सदर प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार संबंधित कुटुंबातील सदस्यांनी केल्यास सदर तक्रारीची चौकशी संबंधित नियुक्ती प्राधिकारी/शिस्तभंगविषयक प्राधिका-याने करावी.चौकशीअंती अनुकंपा नियुक्तीधारकाने प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला सेवेतून काढून टाकण्याची देखील शिक्षा देता येईल. (शासन निर्णय दि.17.11.2016))
(9) कुटुंबातील इतर सदस्यांचे संमंतीपत्र:-
- अ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती ही कुटुंबातील एकाच पात्र नातेवाईकास अनुज्ञेय असल्याने (शासन निर्णय दि. 26.10.1994) कुटुंबातील इतर सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- आ) ज्या शासकीय कर्मचा-यांना वैयक्तिक कायद्यानुसार एकापेक्षा जास्त लग्न करण्यास प्रतिबंध नसेल अशा कर्मचा-याच्या एकापेक्षा जास्त पत्नी हयात असल्यास, ज्या पत्नीला किंवा तिच्या मुलाला/मुलीला अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यायची आहे त्या व्यतिरिक्त अन्य पत्नीचे देखील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. (शासन निर्णय दि. 23.08.1996)
(10) अर्ज करण्यासाठी मुदत:-
- (अ)अनुकंपा नियुक्तीसाठी दिवगंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने शासकीय अधिकारी/कर्मचारी दिवगंत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिका-याकडे विहीत नमून्यात परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (शासन निर्णय दि. 22/8/2005 व शासन परिपत्रक दि.5.2.2010)
- (आ) सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबातील अज्ञान वारसदाराच्या बाबतीत एकाने सज्ञान म्हणजे 18 वर्षाचा झाल्यावर एक वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (शासन निर्णय दि. 11/9/1996 व शासन परिपत्रक दि.5.2.2010)
- (इ) पात्र वारसदारास विहीत 1 वर्षाच्या मुदतीनंतर 2 वर्ष इतक्या कालावधिनंतर (मृत्यूच्या दिनांकापासून 3 वषापर्यंत) तसेच दिवगंत शासकीय कर्मचा-यांच्या अज्ञान वारसदाराच्या बाबतीत तो उमेदवार सज्ञान झाल्यानंतर विहीत 1 वषाच्या मुदतीनंतर 2 वर्षापर्यंत (सज्ञान झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत) अर्ज सादर करण्यास विलंब झाल्यास असा विलंब क्षमापित करण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या विभाग प्रमुखांना देण्यात येत आहेत.अनुकंपा नियुक्ती धोरणातील याशिवाय अन्य कोणत्याही अटी व शर्ती शिथील करण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना राहणार नाहीत. (शासन निर्णय दि. 20.05.2015)
- (ई) जोपर्यंत अनुकंपा नियुक्तीकरीता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उमेदवारांकडून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत त्यांचे नांव प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट्ट करता येणार नाही. ज्यादिवशी संपूर्ण कागदपत्रे प्राप्त होतील. त्यादिवशीच त्यांचे नाव प्रतिक्षासूचीमध्ये समाविष्ट्ट करावे. (शासन परिपत्रक दि.5.2.2010)
(11) अनुकंपा नियुक्तीसाठी वयोमर्यादा:-
- (अ) किमान मर्यादा- 18 वर्ष (शासन निर्णय दि. 11.09.1996)
- (आ) कमाल वयोमर्यादा- वर्षाच्या 45 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असेल. त्यामुळे प्रतिक्षा सूचीतील उमेदवारांना वयाच्या 45 वर्षापर्यंत नियुक्ती न मिळाल्यास त्यांची नावे वयाची 45 वर्ष पूर्ण होताच आवश्यक ती नोंद घेऊन प्रतीक्षासूचीतून काढून टाकण्यात यावीत.(शासन निर्णय दि. 22.08.2005 व दि. 6.12.2010)
(12) अनुकंपा नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता:-
- (अ) पात्र नातेवाईकाची शैक्षणिक अर्हता व निम्न वयोमर्यादेनुसार त्याला गट-क किंवा गट-ड मधील पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय दि. 26.10.1994)
- (आ) संबंधित पदांसाठी विहीत शैक्षणिक पात्रता आणि निम्न वयोमर्यादा याबाबतच्या अटी या नेमणूकांसाठी कटाक्षाने पाळण्यात येतील. (शासन निर्णय दि. 26.10.1994)
- (इ) तथापी, दिवगंत शासकीय कर्मचाऱ्यांची पत्नी शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त इतर अटी पूर्ण करीत असल्यास तिच्या बाबतीत गट-ड मध्ये नेमणूकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्याचे अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला असतील.(शासन निर्णय दि. 26.10.1994)
(13) गट-क मधील लिपीक-टंकलेखक पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी टंकलेखन प्रमाणप सादर करण्यास मुदत:-
- (अ) अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विहीत वेगमर्यादेचे टंकलेखन अर्हता प्रमाणप सादर करण्यासाठी शासन निर्णय दि. 06.12.2010 अन्वये 6 महिने असलेली मुदत वाढवून ती 2 वर्ष इतकी करण्यात येत आहे. अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती दिलेल्या व शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत नियुक्तीपासून 2 वर्ष पूर्ण न झालेल्या उमेदवारांनाही सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांच्या नियुक्तीपासून 2 वर्ष इतकी मुदत देण्यात येत आहे.
- सहा(6) महिन्याच्या कालावधित सदर प्रमाणपत्र सादर न केल्याने ज्या उमेदवारांच्या लिपीक-टंकलेखक पदावरील सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनाही लिपीक-टंकलेखक पदावरील नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षात सदर प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा द्यावी. अशा उमेदवारांनी सदर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लिपीक-टंकलेखक पदावरील अनुपस्थित कालावधीचे कोणतेही वेतनविषयक लाभ न देता सेवा सातत्यासह लिपीक-टंकलेखक पदावर पुन:स्थापीत करण्यात यावे. (शासन निर्णय दि. 20.05.2015)
- (आ) कोणत्याही कारणास्तव दोन वषापेक्षा अधिक मुदतवाढ अनुज्ञेय असणार नाही. हा कालावधी संपताच नियुक्ती संपृष्ट्टात आणावी. (शासन निर्णय दि. 23/08/1996)
- शासन निर्णय दि 23/06/20221 नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतूदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
(14) अनुकंपा तत्वावर गट-क मधील लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर विहीत मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर न केल्यास अनुसरावयाची कार्यपध्दती:-
- अनुकंपा तत्वावर गट-क मधील लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर
- टंकलेखनाची विहीत वेगमर्यादेची परीक्षा पास होऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्या सेवा संपृष्ट्टात आणल्या आहेत, अशा उमेदवारांचा गट-ड मधील नियुक्तीसाठी पदांची उपलब्धता विचारात घेऊन नव्याने नियुक्ती देण्याबाबत विचार करण्यात यावा. मात्र अशा रीतीने गट-ड मधील पदावर नियुक्ती स्विकारल्यानंतर कुठल्याही परस्थितीत गट-क मधील पदासाठी त्याचा विचार करता येणार नाही,ही बाब त्यांना नियुक्तीपूर्वी स्पष्ट्ट करावी. (शासन निर्णय दि. 08.09.1997)
- शासन निर्णय दि 23/06/20221 नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या अनुषंगाने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतूदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
(15) गट-क विहीत लिपीक-टंकलेखक पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे :-
माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन सेवेतील गट-क मधील (वाहन चालक वगळून) संबंधित पदाकरीता महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/व वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम, 1999 च्या नियम 3 अन्वये आवश्यक अर्हता म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी खालील ‘अ’ अथवा ‘ब’ प्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत ‘C.C.C.’ किंवा ‘O’ स्तर किंवा ‘A’ किंवा ‘B’ किंवा ‘C’ स्तर पैकी कोणतेही एक परीक्षा उत्तीर्ग झाल्याचे प्रमाणपत्र किंवा,
- ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांचे यांच्याकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- संगणक ज्ञानाची वरील किमान अर्हता अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या वेळी धारण करीत नसलेल्या उमेदवारांना सदर अर्हता गट-क विहीत पदावर (वाहन चालक वगळून) अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. या दोन वर्षाच्या कालावधित संबंधीतांनी विहीत संगणक अर्हता प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र नियुक्ती अधिका-यांना सादर करावे, अन्यथा हा कालावधी संपताच उमेदवारांची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आपोआप संपृष्ट्टात येईल, अशी स्पष्ट्ट तरतूद उमेदवारांच्या नियुक्तीच्या आदेशात नियुक्ती प्राधिकाका-यांनी नमूद करावी.(शासन निर्णय दि. 24.09.2001)
(16) पद उपलब्धते अभावी गट-क मधील पदाऐवजी गट-ड मधील पदावर नियुक्ती देताना अनुसरावयाची कार्यपध्दती:-
गट-क मधील पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र असणा-या कर्मचा-याला पदाच्या उपलब्धतेअभावी गट-ड मधील पदांवर नियुक्ती दिल्यास पद उपलब्ध होताच गट- क मधील पदावर त्याला प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी. अशी नियुक्ती सरळसेवा नियुक्तीने भरण्यात येणा-या पदांवरील समजण्यात यावी. मात्र गट-ड मधील पदावर अनुकंपा योजनेन्वये नियुक्ती देण्याच्या आदेशात तसा स्पष्ट्ट उल्लेख करण्यात यावा, तसे करण्यात आले तरच गट-क मधील पदावर नियुक्ती देता येईल. (शासन निर्णय दि. 23/08/1996)
(17) अनुकंपा तत्वावर प्रतिक्षासूची ठेवण्याबाबतची कार्यवाही:-
(अ) अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय/सा.प्र.वि.14-अ यांच्याकडील सामायिक प्रतीक्षासूचीबरोबरच संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राकरीता गट-क व गट-ड करीता प्रतीक्षासूची ठेवण्याची दुहेरी प्रतीक्षासूचीची कायगपध्दती आमंलात आणावी. (शासन निर्णय दि. 22.08.2005)
(आ) गट-क व गट-ड मधील पदांवरील नियुक्तीसाठी सक्षम नियुक्ती प्राधिकारी (कार्यालय किंवा विभाग प्रमुख इत्यादी) त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध गट-क व गट-ड च्या रिक्त पदांवर पदांसाठी विहीत अटी व शती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्याकडील प्रतीक्षासूचीतील क्रमानुसार नियुक्ती करु शकतील. मात्र उमेदवारांच्या नियुक्त्या केल्यानंतर त्या उमेदवारांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयांकडील सामायिक प्रतीक्षासूचीतून वगळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना लगेच कळवावीत. बृहन्मुंबईतील गट-क मधील नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्याकडील नियुक्त्यांबाबतची माहिती सा.प्र.वि./14अ ला कळवावी. (शासन निर्णय दि. 22.08.2005 व (शासन परिपत्रक दि.5.2.2010)
(इ) अनुकंपाची प्रकरणे ज्या कार्यालयात/विभागात होतील त्या प्रकरणांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची नावे संबंधित नियुक्ती अधिका-याकडील गट-क व गट-ड च्या प्रतीक्षासूचीत
समाविष्ट्ट करण्यात यावीत. त्याचप्रमाणे ज्या तारखेस अशी नावे कार्यालयाच्या प्रतिक्षासूचीवर घेण्यात येतील त्याच तारखेपासून त्यांची नावे संबंधित जिल्हाधिका-याकडील सामायिक प्रतीक्षासूचीत समाविष्ट्ट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावीत. बृहन्मुंबईतील नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्याकडील गट-क च्या प्रतीक्षासूची/ नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासन विभाग कार्यासन 14-अ यांना कळवावे. (शासन निर्णय दि. 22.08.2005)
(ई) जिल्हाधिका-यांकडे/सामान्य प्रशासन विभागाकडे समन्वयाच्या कामासाठी ठेवलेल्या सामायिक प्रतीक्षासूचीत जिल्हातील विविध कार्यालयांकडून येणारी नवीन नावे मूळ कार्यालयांच्या प्रतीक्षासूचीत समाविष्ट्ट केलेल्या दिनांकानुसार गट-क व गट-ड च्या सामायिक प्रतीक्षासूचीत समाविष्ट्ट करावीत. (शासन निर्णय दि. 22.08.2005
(उ) ज्या कायालयात अनुकंपाधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत नाहीत, परंतु गट-क किंवा गट-ड मध्ये रिक्त पदे उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांच्याकडे वर्षा रिक्त झालेल्या/होणाऱ्या गट-क व गट-ड मधील पदांपैकी विहीत केलेल्या 5 टक्के पदे (10 टक्के- शासन निर्णय दि. 1.3.2014) अनुकंपा धारकांनी भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणीपत्र पाठवावे. अशी मागणीपत्रे पाठवतांना संबंधित कार्यालयाने त्यांच्याकडे संबंधित पदांवर नियुक्ती देण्यासाठी अनुकंपाधारक त्या कार्यालयास उपलब्ध नाही असे प्रमाणित करावे. (शासन निर्णय दि. 22.08.2005)
(ऊ) सर्व जिल्हानिकारी तसेच सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन-14अ) यांनी प्रत्येक 6 महिन्यांनी जानेवारी आणि जुलै मध्ये त्यांच्याकडील सामायिक प्रतीक्षासूचीचा आढावा घेऊन दरम्यानच्या कालावधित नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांची नावे वगळून त्यांच्याकडील सामायिक प्रतीक्षासूची अद्ययावत करतील. यासाठी त्यांच्या कार्याक्षेत्रातील सर्व कार्यालयातील प्रतीक्षासूच्यांचा आढावा घेऊन समन्वयाचे काम करतील. (शासन निर्णय दि. 22.08.2005)
(ए) जिल्हाधिकारी कार्यालयांनी जिल्हातील सर्व कार्यालयात उपलब्ध होणाऱ्या पदांवर नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सामायिक प्रतिक्षासूचीतील अनुकंपा धारकांची नियुक्तीसाठी शिफारस करावी. तसेच शिफारस प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांची राहील. (शासन परिपत्रक दि.5.2.2010)
(ऐ) (शासन निर्णय दि. 22.08.2005) नुसार प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 5 टक्के (10 टक्के शासन निर्णय दि. 1.3.2014) पदे अनुकंपा नियुक्तीने भरावयाची आहेत. नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे असलेल्या विभागाच्या/कार्यालयाच्या प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांसाठी अनुकंपा तत्वावर नियुक्ती रिक्त जास्त उपलब्ध असल्यास त्यानुसार नियुक्ती करावी. तसेच रिक्त पदांची माहिती वेळोवेळी संबंधित जिल्हाधिका-यांकडे सादर करावी.(शासन परिपत्रक दि.5.2.2010)
(ओ) ज्या ठिकाणी विभागप्रमुख हा नियुक्ती प्राधिकारी असेल व त्याचे कार्यक्षेत्र एकापेक्षा अनेक जिल्हयांमध्ये असेल तर विभाग प्रमुखाने नियुक्ती प्राधिकारी या नात्याने त्याच्या अधिकार क्षेत्रातील जिल्हयातील कार्यालयांसाठी एकत्रित प्रतीक्षासूची ठेवावी. तसेच दिवगंत कर्मचारी ज्या जिल्हयातील कार्यालयामध्ये असेल त्या जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाईक प्रतीक्षासूचीवर घेण्यास त्या दिवगंत कर्मचाऱ्यांच्या वारसाचे नाव पाठविण्यात यावे. उदा. एखाद्या प्रशासकीय विभागाचे नियंत्रणाखालील विभागप्रमुखाचे कार्यालय अमरावती येथे आहे. विभागप्रमुख हा गट क साठी नियुक्ती प्राधिकारी असून त्याचे अमरावती, अकोला,वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्हायात कार्यक्षेत्र आहे. अशावेळी अनुकंपा नियुक्तीकरीता गट क साठी मूळ प्रतिक्षासूची नियुक्ती प्राधिकारी म्हणून अमरावती येथील विभागप्रमुखांच्या कार्यालयात ठेवण्यात यावी व या प्रतीक्षासूचील सदर उमेदवारांची नावे सरसकट जिल्हाधिकारी,अमरावती यांच्याकडे न पाठवता दिवगंत कर्मचारी हा ज्या जिल्हातंर्गत कार्यालयातील असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित उमेदवाराचे नाव त्याच्या सामायिक प्रतीक्षासूचीत दाखल करण्यासाठी पाठविण्यात यावे व अशा प्रतीक्षासूचीवरील उमेदवारास नियुक्ती दिल्यानंतर त्याचे नाव दोन्ही प्रतिक्षासूचीतून वगळण्यात यावे. गट ड करीता नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र एकापेक्षा अनेक जिल्हायात असल्यास वरीलप्रमाणेच कार्यपध्दती अनुसरण्यात यावी. (शासन परिपत्रक दि.5.2.2010)
(औ) सैनिक कल्याण विभाग, पुणे व सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील पदे ही त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ माजी सैनिकांतून भरण्याची तरतुद जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. त्यामुळे दिवगंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटूंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी दि.22.8.2005 च्या शासन निर्णयान्वये अस्तित्वात आलेल्या योजनेमध्ये सदर दोन्ही कार्यायातील आस्थापनांचा अपवाद करण्यात या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.
त्या कायालयातील दिवगात कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्याची कार्यवाही दि.22.8.2005 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार न करता, ही कार्यवाही यापूवी अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयामधील (शासन निर्णय दि.12 मार्च 1997) तरतुदीनुसार संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडूनच करण्यात यावी.सैनिक कल्याण विभाग, पुणे व त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये तसेच सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील गट-क व गट-ब मधील दिवगंत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबतचा अर्ज स्विकृत करणे, अर्जाची छाननी करणे व नियमांची पूर्तता होत असलेला अर्ज प्रतीक्षासूचीत समाविष्ट्ट करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याबाबतची प्राथमिक कार्यवाही ही संबंधित कार्यालयांमार्फत करण्यात यावी. त्यानंतर सदर अर्जदाराचे नांव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या सामायिक प्रतिक्षासूचीमध्ये योग्य ठिकाणी समाविष्ट्ट करावे व या सामायिक प्रतीक्षासूचीनुसार ज्येष्ट्ठतेने त्यांचा क्रम अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी आल्यास त्यांच्या जिल्हयातील कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात (अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी रिक्त पदे असल्यास) नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच करण्यात यावी. (शासन निर्णय दि.31.3.2008)