प्रत्येक कार्यालयात वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात येते/आली आहे. जी काही वेतन निश्चिती केली जाते. ही योग्य आहे का हे पाहण्यासाठी शासना कडून वेतन पडताळणीची (पथका) निर्मिती केली आहे. साहव्या वेतन आयोगाची वेतन पडताळणी पूर्ण झाली आहे. आता सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे शासना कडून सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करीता आता नविन प्रणाली (Website) तयार करण्यात आली आहे.
त्यासाठी शासना कडून User Manual For 7th pay Fixation देण्यात आले आहे. वेतननिका या वेबसाईट वर जाऊन User Manual प्रमाणे माहिती भरण्यात यावी. Barcode मिळेल. Submit करण्यात यावे.जोडपत्राची (Annexure) जी Print येते. ती सेवापुस्तकात जोडण्यात यावी. त्यानंतर आपआपल्या वेतन पडताळणी कार्यालयात सेवापुस्तक पडताळणीसाठी देण्यात यावे. सध्या जे अधिकारी/कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे. त्यांची वेतन पडताळणी केली जात आहे.
वेतन पडताळणी मार्गदर्शिका-2023
Obj Code | Descriptions |
1 | दि 01/04/1976 ची पडताळणी झाली नसल्यामुळे शासन परिपत्रक दि.20/08/1986 नुसार संबंधित कार्यालयाने प्रमाणित करावे. |
2 | मागील आक्षेपाची पूर्तता झाली नसल्याने आक्षेप कायम आहे. आक्षेपाची परिपूर्ण पुर्तता करुनच सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करावे. |
3 | म.ना.से.(सु.वे.) नियम 1988/1998/2009/2019 वेतननिश्चिती विवरणपत्र व विकल्प सादर करावेत. |
4 | शा.नि दि. 06/11/1984 नुसार पदोन्नती/कालब्ध पदोन्नतीसाठी दिलेला विकल्प उपलब्ध करावा. |
5 | सा.प्र.वि.शा.नि.दि. 30/12/1987 नुसार मराठी भाषा परिक्षा तसेच सा.प्र.वि.शा. नि.दि. 10-06-76 नुसार हिंदी भाषा उर्तीण झाल्याची सूट देण्याबाबत कार्यालयाने आदेश सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने निर्गमित करुन सेवापुस्तकात नोंद घ्यावी. |
6 | शा.नि.दि. 30/12/1987 नुसार विहीत कालावधीमध्ये मराठी भाषा परीक्षा उतीर्ण नसल्याचे सा.प्र.वि.दि. 01/01/1993 नुसार कार्यवाही करुन अतिप्रधान रक्कम वसूल करावी व सेवापुस्तकात नोंद घ्यावी. |
7 | सेवा प्रवेशात्तोर परीक्षा विहीत मुदतीत/संधीत उतीर्ण झाल्याची नोंद कार्यालयीन आदेशाची सेवा पुस्तकात घेण्यात यावी. |
8 | राजपत्रित अधिकारी यांच्याबाबत महालेखापाल कार्यालयाकडील नमुना 25अ व 25ब ची विववरणपत्र सेवापुस्तकात जोडावी. (शा. नि.वि. वित्त विभाग दि.18/10/1989) |
9 | कनिष्ठ कर्मचा-यांचे वेतन अभिवृध्दी करुन दिले असल्यामुळे त्याबाबत कार्यालयीन आदेशाची नोंद शासन परिपत्रक दि. 10/01/1991 नुसार, कनिष्ठ कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक/जेष्ठता यादी व कार्यालयीन आदेशाची प्रत उपलब्ध करावी. |
10 | पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजुर केलेल्या आदेशाची प्रत उपलब्ध करावी.(शा.नि दि. 6/06/2002) |
11 | गैरहजर/असाधारण रजा/निलंबन कालावधी वगळून वेतनवाढी नियमित करव्यात. (म.ना.से. (वेतन) नियम 1981.) |
12 | निलंबन कालावधी कशाप्रकारे नियमित करण्यात आले आहे.सक्षम अधिकाऱ्याकडील आदेशची नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी. |
13 | पुर्निनियुक्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अंतिम वेतन प्रमाणपत्र तसेच महाराट्र नागरी सेवा(नि.वे.) नियम 1982 मधील नियम 162 तसेच शा.नि दि 27/12/2016 नुसार तसेच वित्त विभाग परिपत्रक दि. 20/02/2019 नियम 7.4 नुसार कार्यवाही करावी. |
14 | माजी सैनिक सवंर्गातील पुर्निनियुक्ती कर्मचाऱ्यांबाबत म. ना. से. (नि. वे.) 1982 नियम 162 तसेच वित्त विभाग शा.नि.दि. 06/08/2001 / दि. 11/07/2012 / दि. 19/11/2016/दि.30/08/2019 नुसार वेतननिश्चती केल्याचे दिसून येत नाही. सुधारीत वेतन निश्चिती करावी. |
15 | चुकीची वेतन निश्चितीमुळे झालेल्या अतिप्रधान रकमेची वसुली तात्काळ करावी. व वसुलीची नोंद सेवापुस्तकात घ्यावी. |
16 | विभागीय चौकशी अंती शिक्षेची अंमलबजावणी विहित दिनांकास करण्यात यावी.त्याबाबतच्या आदेशाची संदर्भासह नोंद सेवापुस्तकात घ्यावी. |
17 | दक्षता मंजूर केल्याची नोंद सेवापुस्तकात घेण्यात यावी. |
18 | महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम- 1981 च्या नियम 39 अन्वये पदोन्नतीच्या पदावर वेतनवाढीच्या तारखा, आदेश नमुद करावा. |
19 | नियमित वार्षिक वेतनवाढीच्या नोंदी स्वक्षांकित कराव्यात. |
20 | सेवापुस्ताकातील रकाना क्र.1 ते 8 परिपूर्ण करुन रकाना क्र. 9 मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी. |
21 | पुन:सुधारित वेतनश्रेणीत केलेल्या वेतननिश्चितीच्या नोंदी सेवापुस्तकातपुन:सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतनवाढी विहीत दिनांकास मंजूर कराव्यात. |
22 | कालबध्द योजना/(सुधारित सेवातर्गंत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ विहीत सेवेपुर्वीच मंजूर करण्यात आला आहे. |
23 | पदोन्नती साखळीबाबत शासन मान्य सेवा प्रवेश नियम उपलब्ध करावेत. |
24 | शासन निर्णय दिनांक 24/02/1986 अन्वये तदर्थ पदोन्नतीसाठी विकल्प अनुज्ञेय नाही. तदर्थ पदोन्नती कोणत्या दिनांकापासून नियमित करण्यात आली. त्या आदेशाची नोंद सेवापुस्त्कात घ्यावी. / तदर्थ पदोन्नतीच्या कालावधीत वेतनवाढी कोणत्या नियमानुसार मंजूर करण्यात आली.स्पष्टीकरण सादर करावे. |
25 | सेवा प्रवेशात्तोर परीक्षा उत्तीर्ण नसल्याने किंवा शिस्तभंगाच्या कारणास्तव रोखलेल्या वेतनवाढी मुक्त केल्याबाबतची नोंद संदर्भासह घेण्यात यावी. |
26 | शासन अधिसूचना दिनांक. 06/05/1991 अन्वये एतदर्थ मंडळाची मराठी टंकलेखन/लघुलेखन परीक्षा विहित काळात उतीर्ण झाल्याची नोंद घ्यावी. |
27 | शासन अधिसूचना दिनांक. 06/05/1991 अन्वये एतदर्थ मंडळाची मराठी टंकलेखन/लघुलेखन परीक्षा विहित काळात उतीर्ण झाले नसल्याने वेतनवाढी रोखल्याची कार्यवाही केलेली दिसून येत नाही. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. |
28 | शासन निर्णय दि. 12/09/1994 अन्वये वेतन निश्चिती करताना कुंठीत वेतनवाढी मंजुरीची नोंद घ्यावी. |
29 | शासन निर्णय दि. 26/11/1990 अन्वये लिपीक टंकलेखक या संयुक्त संवर्गात समावेश केल्याची नोंद तसेच आवश्यक वेतनिनिश्चिती केल्यायची दिसून येत नाही. |
30 | परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्याची नोंद सेवापुस्तकात दिसून येत नाही (शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि..29/02/2016) |
31 | न्यायालयीन प्रकरणा संदर्भात मा.न्यायाधिकरणाकडून प्राप्त झाले आदेशाच्या अनुषंगाने शासन आदेशाची प्रत जोडावी. |
32 | सेवापुस्तकातील वेतन निश्चितीतील अनावश्यक नोंदी रदद कराव्यात. |
33 | आगाऊ वेतनवाढ मंजूरीची कायार्यालयीन आदेशासह नोंद घेण्यात यावी. (दि.01/01/2006 पुर्वी ) |
34 | पदावनतीच्या पदावर महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 च्या नियम 12 नुसार वेतन निश्चिती करावी. |
35 | शासन परिपत्रक दि .20-01-2001 नुसार सेवापुस्तका अद्यावत करावे. |
36 | म.ना.से. (सु.वे.) नियम 1978/1988/1998/2009/2019 च्या अधिसूचनेत पदनाम आढळून येत नाही.त्यामुळे सदर पदाचा अंतर्भाव अधिसूचनेत करणेबाबत शासनास आवश्यक तो प्रस्ताव सादर करावा. |
37 | शा.नि दि. 20/07/2002 व दि. 05/05/2007 नुसार संगणक अर्हता परिक्षा विहीत मुदतीत उतीर्ण झाल्याची नोंद सेवापुस्तकात दिसून येत नाही. नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. |
38 | शासन अधिसूचना दि. 22/04/2009 च्या नियम 10 परंतुक 2 नुसार दि.01/01/2006 रोजी वेतनवाढ मंजूर केल्याची नोंद घ्यावी. |
39 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या अनुषंगाने पदोन्नतीच्या विद्यमान वेतनावर सातवा वेतन आयोगाचा विकल्प अनुज्ञेय नाही. (शासन परिपत्रक वित्त विभाग दि.20/02/2019 परि क्र.7.8) |
40 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या तरतुदीनुसार वेतन निश्चितीबाबतचे वेतिनका प्रणालीतील जोडपत्र-3 सेवा पुस्तकास जोडावे. |
41 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2009 मधील नियम-8 जोडपत्र-3 मधील मुळवेतन,वेतन एकवटणेच्या लाभासाठी, म.ना.से. (सु.वे.) 2019 मधील नियम-7च्या स्पष्टीकरणान्वये विचारात घेता येणार नाही |
42 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या स्पष्टीकरण परंतु 1 अन्वये सदर कर्मचारी कुंठीत वेतनावर वेतन घेत नसल्याने लाभ देय नाही. (शासन परिपत्रक वित्त विभाग दि.20/02/2019) |
43 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या नियम-7 टिप 8 अन्वये सर्व बाबीची पूर्तता करतात किंवा कसे याबाबत उचित कागदपत्रे सादर करावी. |
44 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या नियम 8 अन्वये पुढील वेतनवाढ अचुक दिनांकास दर्शविण्यात यावे. |
45 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या नियम 11 च्या अनुषंगाने विकल्प सेवापुस्तकास जोडावा. |
46 | म.ना.से. (सु.वे.) नियम 2019 च्या नियम 13 धारकास आ.प्र.यो.मिळाला आहे.त्या पदाची पदोन्नती साखळी आकृतीबंध सोबत सादर करावा. सदर पद एकाकी आहे किंवा कसे ? |
47 | दि. 01/01/2016 नंतरची शासकीय सेवेत नियुक्ती असल्यामुळे वेतन निश्चिती असल्यामुळे वेतन निश्चितीची पडताळणी करता येत नाही. |
48 | शा. नि.वित्त विभाग दि. 01/09/2015 प्रमाणे वार्षिक वेतनवाढ कमाल टप्पयाच्या पुढे जात असेल तर कमाल टप्यावर सिमीत करुन एक वर्षानंतर सुधारीत वेतनबॅंड मंजूर करुन वेतनवाढ अनुज्ञेय होईल.त्याप्रमाणे कार्यवाही कार्यवाही करावी. |
49 | आश्वासित प्रगती येाजनेच्या दि. 01/01/2006 रोजीच्या वेतनाचे पुर्नविलोकन करावे. शा. नि. वित्त विभाग दि. 31/08/2009 प्रमाणे कार्यवाही करावी. |
50 | शा. नि.वित्त विभाग दि. 05/05/2010 अन्वये वेतनवाढी सुधारीत कराव्यात. |
51 | म. ना. से. (सु.वे.) 2009 नियम क्र. 7 अन्वये दि. 01/01/2006 ची वेतन निश्चिती नोंद करण्यात आलेली नाही. सेवापुस्तकात नोंद घेण्यात यावी. |
52 | शा. नि.वित्त विभाग दि. 20/07/2001 किंवा दि. 01/04/2010 अन्वये आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चितीबाबत पुन्हा अवलोकन करावे व अचुक वेतननिश्चिती करावी. |
53 | शासन परिपत्रक वित्त विभाग दि. 13/06/2016 प्रमाणे सुधारीत वेतन निश्चिती केल्याप्रमाणे अतिप्रदान किती? नोंद घ्यावी. शा.नि.वित्त वि दि.21/08/2019 अन्वये दि.13/06/2016 रदद करण्यात आला आहे. |
54 | दि. 01/01/2006 रोजीची वेतन निश्चिती करताना शा. नि. वित्त विभाग दि.03/09/2013 नुसार कार्यवाही करण्यात यावी. |
55 | म.ना.से.(सुधारित वेतन) नियम 2019, नियम 7 अन्वये केलेली वेतन निश्चिती चुकीची आहे. |
56 | सेवापुस्तका सोबत जोडण्यात आलेले ७ व्या वेतन आयोगानुसार केलेल्या वेतन निश्चितीचे जोडपत्र व प्रणालीमधून तयार केलेले वेतन निश्चितीचे जोडपत्र यामध्ये तफावत आहे. |
57 | 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनिका प्रणालीतून करण्यात आलेली वेतननिश्चितीची ही प्रणालीमधील योग्य पर्याय वापरुन करण्यात आलेली नाही. |