गट विमा योजना-1982 ही शासन निर्णय दि.26/04/1982 च्या शासन निर्णयानुसार 01/05/1982 पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना सक्तीची असुन अधि/कर्मचारी ज्या दिवसासापासून सेवेत रुजू झाला. त्या दिवसापासून त्याला ही योजना लागू होते. हया योजनेचा उददेश कर्मचारी यांचा आकस्मीक मृत्यु झाला तर त्यांच्या कुटूंबास काही मदत व्हावी. ही योजना दुहेरी स्वरुपाची आहे.
1) शासन निर्णय दि.26/04/1982 नुसार दि. 1 मे 1985 ते 30 एप्रील 1986 पर्यंत व शासन निर्णय दि. 8/1/1990 नुसार दि. 1 जानेवारी 1990 ते 31 डिसेंबर 1990 रोजी नियमीत शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून वर्गणी किंवा बचत निधी कपात करण्यात येते. उदा क वर्गासाठी सध्या रु.360 पगारातून बचत निधी/वर्गणी कपात करण्यात येते. व ज्या दिवशी
कर्मचारी सेवेतून निवृत्त होईल. त्या दिवसी कर्मचाऱ्याला जी काही रककम येईल ती कर्मचाऱ्याला देय राहील.
2) शासन निर्णय दि.26/04/1982 नुसार दि. 2 मे 1985 ते 30 एप्रील 1986 पर्यंत व शासन निर्णय दि. 8/1/ 1990 नुसार दि.2 जानेवारी 1990 ते 31 डिसेंबर 1990 रोजी नियमीत शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून केवळ विमा संरक्षणाचा हप्ता कपात करण्यात येतो. उदा. क वर्गासाठी सध्या रु.120 पगारातून कपात करण्यात येते. जर शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याला मृत्यु आल्यास,कुटुंबांला देय होणारी विम्याची रक्कम क वर्गासाठी 3 लक्ष 60 हजार देय ठरते. तसेच जेवढे दिवस सेवा झाली असेल. त्या दिवसाची बचत निधीची रककम जे काही होईल ते देय ठरते. शासकीय कर्मचारी हा सेवा निवृत्त झाला तर त्याला बचत निधीची रक्कम मिळते.
खालील तत्क्त्यावरुन गट विमा योजनाचे बचत निधी व विमा संरक्षण देय ठरते.
गट विमा योजना -1982 | गट | |||||||||
अ | ब | क | ड | |||||||
युनिट | ||||||||||
अ.क्र. | शासन निर्णय | वर्ग /गट | कालावधी | 16 | 8 | 6 | 4 | |||
1 | दि.26/04/1982 | वर्ग -1,2,3 व 4 | 1.5.1982 | 31.12.1989 | 80 | 40 | 20 | 10 | ||
2 | दि.08/01/1990 | वर्ग -1,2,3 व 4 | 1.1.1990 | 31.12.2001 | 120 | 60 | 30 | 15 | ||
3 | दि.26.07.2002 | गट-अ,ब,क,ड | 1.1.2002 | 31.12.2009 | 480 | 240 | 60 | 30 | ||
4 | दि.02/08/2010 | गट-अ,ब,क,ड | 1.1.2010 | 31.12.2015 | 960 | 480 | 120 | 60 | ||
5 | दि.30/01/2016 | गट-अ,ब,क,ड | 1.1.2016 | अदयापपर्यंत | 960 | 480 | 360 | 240 | ||
दि.30/01/2016 च्या शासन निर्णयानुसार विमा संरक्षण नवनियुक्त कर्मचारी हा 2 जानेवारी ते 31 डिसेंबर मध्ये लागला असेतर पुढील प्रमाणे कपात करण्यात यावे. | 320 | 160 | 120 | 80 |
उदा:- श्री राम सोळंखे(काल्पनिक नांव) हे 01.01.84 ला शिपाई (वर्ग ड) म्हणुन त्यांची नियुक्ती झाली. त्यांची पदोन्नती कनिष्ठ लिपीक(गट क) म्हणुन 08.08.90 झाली. त्यानंतर त्यांची पदोन्नती वरिष्ठ लिपीक (गट क) म्हणुन 01.09.2001 रोजी झाली. त्यांनंतर त्यांची पदोन्नती कार्यालयीन अधीक्षक (गट ब) म्हणुन दि.03.06.2011 ला झाली. श्री सोळंखे हे 31.01.2021 रोजी सेवा निवृत्त झाले. तर त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी बचत निधी किती मिळेल.
महाराष्ट्र राज्य गट विमा योजना १९८२
बचत निधी गणना
कर्मचाऱ्याचे नाव-श्री राम सोळुंखे | पदनाम-अधीक्षक| कार्यालयाचे नाव- महाराष्ट्र विभाग
श्री सोंळुखे वर्ग ड साठी गवियो सदस्यत्व दिनांक 01-01-1984 असा लिहिला आहे, परंतु शासन निर्णयानुसार अचूक दिनांक 01-05-1984 असा आहे.खाली दर्शविलेली गणना ही 01-05-1984 ह्या अचूक सदस्यत्व दिनांका नुसार करण्यात आली आहे. गट ड असल्यामुळे शा.निर्णायानुसार सदस्यत्वानुसार गणना केलेले युनिट्स:-1 येते. सदस्यत्वानुसार गणना केलेली गवियो बचत निधीची रक्कम रुपये-44640/-येते
श्री सोंळुखे वर्ग क साठी प्रथम पदोन्नती दिनांक 08-08-1990 असा आहे, परंतु शासन निर्णयानुसार अचूक दिनांक 01-01-1991 येतो. खाली दर्शविलेली गणना ही दि.01-01-1991 ह्या अचूक सदस्यत्व (पदोन्नती) दिनांकानुसार केली आहे.प्रथम पदोन्नती करिता गणना केलेले युनिट्स : – 1 येते. वर्ग क साठी 2 युनिट आहे. पण सुरुवातीला वर्ग ड चे 1 युनिट व वर्ग क चे 1 युनिट असे 2 युनिट होते. सदर पदोन्नती करिता गणना केलेली गवियो बचत निधीची रक्कम -29412/- येते
टिप:-एकदा तुम्ही क वर्गाचे सदस्य झालात तर,पुन्हा क वर्गाचे उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. द्वितीय पदोन्नती ही कनिष्ठ लिपीक महणुन वर्ग मध्ये झाली आहे.
श्री सोंळुखे वर्ग ब साठी तृतीय पदोन्नती दिनांक 03-06-2011 असा लिहिला आहे, परंतु शासन निर्णयानुसार अचूक दिनांक 01-01-2012 असा आहे.खाली दर्शविलेली गणना ही 01-01-2012 ह्या अचूक सदस्यत्व (पदोन्नती) दिनांकानुसार केली आहे. तृतीय पदोन्नती करिता गणना केलेले युनिट्स:-6 शासन निर्णयानुसार वर्ग ब साठी 8 युनिट आहे. वर्ग ड चे 1 युनिट,वर्ग क चे 1 युनिट व वर्ग ब चे 6 युनिट एकूण-8 युनिट येते. सदर पदोन्नती करिता गणना केलेली गवियो बचत निधीची रक्कम- 40362/- येते
एकूण गणना केलेले युनिट्स:- 8
एकूण बचत निधी रक्कम (अंकात):-44640+29412+40362=114414
श्री राम सोळुंखे यांना सेवा निवृत्त झाल्यानंतर रुपये -114414 मिळेल.
https://mahakosh.maharashtra.gov.in/gis/ या वेबसाईट जाऊन गणना करण्यात यावी.
शासन निर्णय दि.19/03/2021 नुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि. 01 जानेवारी ते दि.31 डिसेंबर 2021 या कालाविधीकरीता निर्गमित केले आहे.या शासन निर्णयानुसार समजून घेऊयात.
श्री सोळुंखे हे वर्ग ड दि. 01-01-1984 गवियोना सुरवात दि.01.05.1985(1×44640=44640)
श्री सोळुंखे हे वर्ग क दि. 08-08-1990 गवियोना सुरवात दि.01.01.1991(1×41744=29412)
श्री सोळुंखे हे वर्ग ब दि. 03-06-2011 गवियोना सुरवात दि.01.01.2012(6×6727=40362)
एकूण गणना केलेले युनिट्स:- 8
एकूण बचत निधी रक्कम (अंकात):-44640+29412+40362=114414
सर्व आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी बदलेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मुळ पदाचा विचार न करता विमा वर्गणी वसूल करण्यात यावी. तसेच वरिष्ठ वर्गातील वेतनश्रेणीचे पद कनिष्ठ गटात अंतभूत झाल्यास मासिक वर्गणीचा दर पूर्वीच्याच वरिष्ठ वर्गातील वेतनश्रेणीप्रमाणे ठेवण्यात यावा व त्या दराप्रमाणे त्या कर्मचा-यांना विमा निधीची रककम देण्यात यावी.
*अटी व शर्ती मुळ शासन निर्णयात पाहण्यात याव्यात.
जिल्हा परिषद
शासन निर्णय दि. 16/01/2020 नुसार जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा येाजना-1190 वर्गणीच्या दरात वाढ करण्यात आली आली आहे. तसेच या शासन निर्णयातील संदर्भिय शासन निर्णय पाहण्यात यावे.
म.शा. संचालय,लेखा व कोषागारे यांचेपत्र दि.15/12/2020 नुसार एकस्तर पदेान्नतीच्या अनुषंगाने गट विमा योजनेची वर्गणीची वसुली कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनश्रेणीप्रमाणे करण्यात यावी.
राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हापरिषद कर्मचारी प्रथम https://billportal. mahakosh. gov.in / BillPortal/ या वेबसाईटवर जावे. येथे User Login करुन गट विमा येाजना(GIS 8) मध्ये जाऊन बील तयार करावे.Scheme Code अचूक निवडावे.नमुना/प्रपत्र 8,नमुना 11 व सेवापुस्तकामध्ये गट विमा येाजनाची नोंद असलेले पान सोबत जोडावे. तसेच Bill Portal वापरतानांच्या सूचनांचाउपयोग करण्यात यावा. सोबत billportal वर दिलेले आर्थिक वर्षानिहाय परीगणीय तक्ताचाउपयोग करावा.