एक वर्षापेक्षा अधिक परंतु सहा वर्षापेक्षा अधिक नाही अशा कालावधीपर्यंत प्रशासकीय कारणाकरीता प्रलंबित राहिलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या सुद्धा वेतन व भत्यांच्या अथवा वेतनवाढीच्या थकबाकींच्या दाव्यांच्या रकमांचे प्रदान करण्यास मंजुरी देणेसाठी महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-2013/प्र.क्र.30/2013/विनियम, भाग-2/दिनांक 17 एप्रिल 2015 अनुसार वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ चे भाग पहिला, उपविभाग एक चे अ. क्र. ४ ३९(ब ) टीप-४ नुसार खालील सक्षम प्राधिकारी यांचे स्वाक्षरीचे कार्यालयीन आदेश काढणे आवश्यक असते. सदरचे आदेश काढण्याकरिता प्रशासनिक विभाग, विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख यांना पूर्ण अधिकार आहेत. याचा नमुना यासोबत सादर करण्यात येत आहे.