राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना|State Government Employees Group Personal Accident Insurance Scheme

Photo of author

By Sarkari Channel

प्रस्तावना :- सदर योजनेमध्ये अपघातामुळे कायम स्वरूपाचे अपंगत्व/विकलांगात्व आल्यास व त्यामुळे सदर कर्मचा-याच्या उपजीविकेस धोका निर्माण झाल्यास त्याला ठोस रक्कमेच्या स्वरूपात नुकसान भरपाई देण्याकरिता “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात
विमा योजना”सुरू शासन निर्णय दिनांक 04/02/2016 नुसार दि. 01/04/2016 पासून लागू करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक 18/02/2017 नुसार सदर “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील, भारतीय पोलीस सेवेतील व भारतीय वन सेवेतील अधिकारी तसेच सर्व राज्य शासकीय कर्मचात्यांना तसेच,प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी / कर्मचारी यांना देखील दि. 01/04/2017 पासून लागू करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक 11/08/2017 नुसार “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” निमशासकीय स्थापनेवरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. ” राज्यातील शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व निमशासकीय कार्यालय, जिल्हा परीषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत,महानगरपालीका,नगरपालीका,नगरपरिषदा, नगरपंचायत, शासकीय महामंडळे, मंडळे,सार्वजनिक उपक्रम,सांविधानिक संस्था,मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था/महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, पारंपारिक विद्यापीठे यांच्या अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी वगळून ) यांना दि. 01/04/2017 पासून लागू करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक 18/02/2017 नुसार “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना”या योजनेकरीता नवीन जमा उपलेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत.

शासन निर्णय दिनांक 05/03/2019 नुसार “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी, 2023 नुसार दिनांक 01 एप्रील 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये  वाढ करण्यात येत असून व सदर वर्गणी व राशीभूत रक्कम खालीलप्रमाणे गटनिहाय निर्धारित करण्यात येत आहे.

गटराशीभूत विमा रक्कमवार्षिक वर्गणीवस्तू व सेवाकरएकूण वार्ष‍िक वर्गणी
गट-अरू.25 लाखरु. 750/-रु.135/-रु.885/-
गट-बरू.20 लाखरु. 600/-रु.108/-रु.708/-
गट-करू.15 लाखरु. 450/-रु.81/-रु.531/-
गट-डरू.15 लाखरु. 450/-रु.81/-रु.531/-

टिप :- कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गंत किंवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गंत वरिष्ठ वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या अनुषंगाने त्यांच्या मूळ पदाचा विचार न करता अपघात विमा योजनेची वर्गणी घेण्यात यावी व त्याप्रमाणे लाभ अनुज्ञेय करावे. कर्मचाऱ्यांकडून वर्गणी घेताना तो ज्या  पदाचे वेतन घेत आहे. त्या पदाच्या गटाप्रमाणेच वर्गणी घेण्यात यावी व लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत. तथापि, योजना वर्षाच्या कालावधी त्या पदाचा गट बदलला तर त्यापुढील योजना वर्षाची वर्गणी व अनुज्ञेय लाभ यामध्ये बदल होतील.

टीप : ज्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून सदस्यत्व द्यावयाचे आहे, त्यांच्या प्रकरणी चालू वर्षातील मार्च महिन्याची वर्गणी आणि  त्यापुढील वर्षाची पूर्ण वर्गणी फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकातून वसूल करण्यात यावी.

माहे फेब्रुवारी महिन्याची वेतनाची देयके सादर झाल्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी  तसेच, ज्या कर्मचाऱ्यांची वर्गणी माहे  फेब्रुवारी महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांना अपघात योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी, उपरोक्त परिच्छेद-१ मधील सुधारणांच्या अनुषंगाने, दि.०५.०३.२०१९ च्या शासन निर्णयाच्या पहिल्या परिच्छेदातील अ.क्र.४ मध्ये खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे. :-

योजना लागू होण्याच्या कालावधीनुसार खालीलप्रमाणे वर्गणी वसूल करण्यात यावी :-

अ. क्र.सदस्यत्व देण्याचा महिना योजनेचाकालावधी गट-अगट-बगट-क व ड
1एप्रिल ते सप्टेंबर6 महिन्यापेक्षा जास्तरू.750 + GSTरू.600 + GSTरू.450 + GST
2ऑक्टोंबर ते डिसेंबर6 महिन्यांपर्यंतरू.563 + GSTरू.450 + GSTरू.338 + GST
3जानेवारी ते फेब्रुवारी 3 महिन्यांपर्यंतरू.375 + GSTरू.300 + GSTरू.225 + GST
4मार्च1 महिन्यांपर्यंतरू.188 + GSTरू.150 + GSTरू.113 + GST

योजनेतील  सदर सुधारणेच्या अंमलबजावणीसाठी  प्रत्येक कार्यालय प्रमुख्यांने त्यांच्या अधीनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून  अपघात विमा वर्गणी  माहे फेब्रुवारी, 2023 देय  मार्च 2023 च्या वेतनातून व तदनंतर दरवर्षी कपात करणे  आवश्यक आहे.

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करण्याची जबाबदारी सदस्य कार्यरत असलेल्या संबंधीत कार्यालयाच्या आहरण व सांवविरण अवधकारी यांची आहे.राज्य शासकीय कर्मचारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना आणि राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 या स्वतंत्र असतील. सेवेत असतांना सदस्याचा अपघाताने मृत्यु झाल्यास राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982  अंतर्गत देय विमा निधी रक्कमे व्यतिरीक्त समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेखालील लाभ देय असेल.

अ. राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या सदस्यास अपघाती मृत्यु अथवा कायमस्वरुपी अपंगत्व/विकलांगता असल्यास खालील तक्त्यानुसार लाभ अनुज्ञेय आहे.

अ.क्र.अपघाताचे स्वरुपटक्केवारी
1.अपघातामुळे आलेला मृत्यु100
2.अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व/विकलांगता100
3.अपघातात दोन हात, दोन पाय,  किंवा दोन्ही डोळे गमवून अपंगत्व/ विकलांगता  आल्यास100
4.अपघातामध्ये एक हात, एक पाय,  किंवा डोळा गमवून अपंगत्व/ विकलांगता  आल्यास50
5कायमचे अशत:  अपंगत्व/विकलांगता 
 दोन्ही पायांचे अंगठे20
 अंगठ्याचे दोन्ही भाग5
 अंगठ्याचे एक भाग2
 दोन्ही कानाचे बहिरेपण50
 एका कानाचे बहिरेपण15
 एका हाताची चारी बोटे व अगंठा40
 हाताची चार बोटे35
 हाताच्या अगंठ्याचा एक पेरा25
 हाताच्या अगंठ्याचे दोन्ही पेरे10
 तर्जनीचे तिन्ही पेरे10
 तर्जनीचे दोन्ही पेरे8
 तर्जनीचा एक पेरा4
 मधल्या बोटाचे तिन्ही पेरे6
 मधल्या बोटाचे दोन्ही पेरे4
 मधल्या बोटाचा एक पेर2
 अनामिकेचे तिन्ही पेरे5
 अनामिकेचे देान्ही पेरे4
 अनामिकेचा एक पेर2
 करांगळीचे तिन्ही पेरे4
 करांगळीचे दोन्ही पेरे3
 करांगळीचा एक पेर2
 6बोटे व मनगट यांना जोडणाऱ्या अस्थी (metacarpals)
 1. पहिले व दुसरे बोट (अतिरिक्त)3
 2. तिसरे, चौथे व पाचवे बोट (अतिरिक्त)2

ब. शासन निर्णय दि. 15/02/2018 नुसार राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत वार्षिक वर्गणी (विमादर) खालील तक्त्याप्रमाणे आहे

अ.क्र.गटराशीभूत विमा रक्कम (Capital Sum Insured)वर्गणीचा तपशील
1गट अ ते ड10 लाखवार्षिक वर्गणीप्रचलित सेवाकर (18%)एकूण वर्गणी
   30054354

क. योजनेचा लाभ खालील कारणाकरीता देता येणार नाही.

  • 1. नैसर्गीकम मृत्यू.
  • 2. आत्महत्या वा तसा प्रयत्न.
  • 3. जाणीवपूर्वक जखम करून घेणे.
  • 4. आमली किंवा मादक पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू.
  • 5. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धामध्ये मृत्यू झाल्यास.
  • 6. शिकार, गिर्यारोहण.
  • 7. योजनेच्या सभासदाच्या मृत्यूस त्यांच्या वारसदार/वारसदारांचा प्रत्यक्ष किंवा अ प्रत्यक्ष सहभाग असल्यास अशा वारसदारांना.
  • 8. प्रसुती किंवा बाळंतपणा दरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास.
  • 9. गुन्हेगारी उददेशाने कोणत्याही कायदयाचे उल्लांघन केल्यामुळे आलेला मृत्यू  किंवा विकलागांत्व.
  • 10.गुप्त रोग किंवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलागंत्व.
  • 11. किरणोत्सर्ग, अणुभट्टया, युध्द व बंड इत्यादी तत्सम करणांमुळे उद्भवलेला मृत्यू  किंवा विकलांगत्व.
  • ड. सदस्यास विमा रक्कमेचे  प्रदान खालील नियम, अटी व शर्तीच्या अधीन राहून देय असेल.
  • 1. योजनेचे सदस्यत्व स्वीकारातांना नामनिर्देशन करणे अवश्यक आहे.
  • 2. अपघाती मृत्यु किंवा कायमचे आंशिक अपंगत्व/विकलांगता आहे. अशा प्रकरणाची प्रकरणात आवश्यक त्या परिस्थितीत पोलीसांकडे F.I.R. नोंदवलेला असणे आवश्यक आहे.
  • 3. अपघातामुळे कायमचे आंशिक अपंगत्व/विकलांगता आली आहे. ही बाब जिल्हा शल्य चिकीत्सकाने किंवा  विमा सांचालक यांनी मंजूर केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पॅनलमधील चिकित्सक यांनी प्रमाणति करणे आवश्यक आहे.
  • 4. सदस्याने किंवा त्याच्या नामनिर्देशीत वारसदाराने संबंधीत कार्यालय प्रमुखामार्फत विमा दावा दाखल करणे आवश्यक आहे.
  • 5. जर एखाद्या सदस्याने नामनिर्देशन पत्र  दिले नसेल किंवा त्याने दिलेले नामनिर्देशन पत्र 
  • संपूर्णत: किंवा अशंत: अग्राह्य असेल तर विमा योजनेनुसार देय होणारी रक्कम सदस्यांच्या मृत्यूनंतर ज्या व्यक्तीस न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र मंजूर करण्यात आललेल आहे. अशा व्यक्तीस विमाछत्राची रक्कम प्रदेय राहील.
  • 6.  शासन निर्णय दिनांक 04/02/2016 मधील नियम, अटी व शर्ती पाहण्यात याव्यात.

जोडपत्र – 4 भरलेल्या नामननर्देशनाचा नमुना जोडण्यात आला आहे.

Leave a Comment