प्रस्तावना:-गट विमा योजनाबददल आगोदच माहिती देण्यात आली आहे. अधीक्षक पद (साहव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे 4300/-व सातव्या वेतन आयोगानुसार एस-14 38600-122800) हे वर्ग क मध्ये येत असतांना गट विमा योजना मध्ये त्यांची रक्कम रु 480/- का कपात करण्यात येते? कारण शासन निर्णय दि.02/07/2002 व दि.27/05/2016 अन्वये पदाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
पाचव्या वेतन आयोगानुसार पदाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. अधीक्षक पद हे गट ब मध्ये दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे अधीक्षक पद जरी वर्ग क मधले असले तरी त्यांचा गट हा ब आहे म्हणुन अधीक्षक पदाची वर्गणी रु 480 कपात करण्यात येते. आपल्या कार्यालयानुसार पदाचे वर्गीकरण पाहण्यात यावे. व शासन निर्णयानुसार गट विमा योजना ची वर्गणी कपात करण्यात यावी.
वेतनश्रेणीच्या आधारे पदांचे गटनिहाय वर्गीकरण न करणेबाबतचा शासन निर्णय दि.06/03/2020 वाचण्यात यावा. प्रत्येकाने स्वत:च्या कार्यालयानुसार कार्यवाही करावी. प्रत्येक शासन विभागाचे शासन निर्णय अलग अलग असतात. ते सुध्दा पाहवे. सामान्य प्रशासनाचे नियम सर्वांनी लागू होतात.
शासन निर्णय दि. 04/2/2022 अनुसार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना,1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परीगणितीय तक्ते दि.01 जानेवारी 2022 ते दि.ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीकरीता.