मोटार कार/सायकलची व्याजाची परिगणना | Motorcycle | Motor Car Interest

Photo of author

By Sarkari Channel

महाराष्ट्रात, राज्य कर्मचाऱ्यांना मोटरसायकल किंवा मोटार कार अॅडव्हान्स प्रोग्रामचा लाभ घेण्याचा पर्याय आहे. या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांना मोटारसायकल किंवा कार खरेदी करण्यासाठी सरकारकडून कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. हे कर्ज अनेक वर्षांच्या कालावधीत पगार कपातीद्वारे हप्त्यांमध्ये परत केले जाऊ शकते.

मोटारसायकल किंवा मोटार कार अॅडव्हान्स कार्यक्रम ही राज्य कर्मचार्‍यांसाठी उच्च-व्याजदराच्या ओझेशिवाय किंवा मोठ्या डाउन पेमेंटची गरज नसताना वाहन घेण्याची एक उत्तम संधी आहे. हा कार्यक्रम विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना कामावर जाण्यासाठी आणि जाण्यासाठी किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी वाहनाची आवश्यकता आहे.

मुंबई वित्तीय अग्रिम-१९५९ च्या नियम  136,137 व 139  अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मोटार कार/ मोटार वाहन/नवीन मोटार सायकल/स्कूटर/ मोपेड/ सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल अग्रिमावरील व्याजाची परिगणना खालीलप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे दर वर्षी निश्च‍ित करण्यात येते. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत जो व्याजाचा दर मोटार कार/सायकलसाठी आहे.त्या प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

ज्या आर्थ‍िक वर्षात मोटार कार/ मोटार वाहन/नवीन मोटार सायकल/स्कूटर/ मोपेड/ सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल अग्रिम मंजूर केले आहे त्यावर्षासाठी जो व्याज दर मोटार कार/सायकलसाठी आहे तो व्याज दर मुददल संपल्यावर लागू राहील. उदा:- सन 2015 मध्ये मोटार कार अग्रिम कर्मचाऱ्यास देण्यात आले तर सन 2015 मध्ये जो व्याज दर असेल त्या दराने व्याजाची वसूली शासन परिपत्रक दि.05/05/2000 नुसार दिलेल्या सूत्राप्रमाणे करण्यात येते.

व्याजाची परिगणना खालील दराप्रमाणे करण्यात यावी.

अ.क्र.वर्षमोटार-कार

 व्याज दर
मोटार-सायकल/स्कूटर/
मोपेड/तीन चाकी 

स्वंयचलित सायकल
व्याज दर
शासन निर्णय दिनांक
01/04/2003               ते                     31/03/200911.5%8%
दिनांक-25/09/2003

दिनांक-06/01/2007
दिनांक-16/11/2007
दिनांक-01/01/2009
01/04/2010 ते 31/03/201112%9%दिनांक-24/06/2010
01/04/2011  

 ते  
आजपर्यंत
11.5%9%
दिनांक-10/05/2012

दिनांक-10/04/2014
दिनांक-01/09/2015
दिनांक-27/04/2017
दिनांक-13/08/2020

टीप :- सायकलचा व्याज दर देण्यात आला नाही. आता सायकल साठी व्याज आकारण्यात येत नाही.

उदा :- श्री रानडे यांना 01/04/2015 रोजी रुपये 60000/- मेाटार-सायकल अग्रिम मिळाले. रानडे यांना मुददल व व्याजासह किती रक्कम शासनास जमा करावे लागेल.मोटार कार/सायकलसाठी व्याजाचा दर हा 01/04/2015 रोजी 9% होता.

= शा.नि. 2014 प्रमाणे अग्रिमाची वसूली व्याजासह 60 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात यावी. प्रथम अग्रिम व नंतर व्याज वसूल करण्यात यावे.

श्री रानडे यांचे मासिक मुददल रुपये 1200/- प्रमाणे 50 हप्त्यात कपात करण्यात आली आहे. व्याजाची परिगणना खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

मोटार सायकल व्याजाची परिगणना
=N(N+1) XMXR
212100
=50(51)X1200X9
212100
=1275X10800
1200
=13770000
1200
=11475

व्याजाची परिगणना केल्यानंतर रुपये-11475 व्याज आले आहे. व्याजाचा हप्ता 11475/9=1275. श्री राऊत यांना 1275 प्रमाणे 9 हपत्यात वसुली करण्यात येईल. मुददलाचे 1200 x 50 =60000/- व 1275 x 9 = 11475/- एकूण 59 हत्यात =60000+11475 = 71475/- एवढी रक्कम  (मुददल व व्याज) श्री रानडे यांच्या पगारातून कपात करण्यात येईल.
टीप :- जो पर्यंत अग्रिम धारकाच्या खात्यात अग्रिम जमा होत नाही. तो पर्यंत मुददलाची रक्कम कपात करता येत नाही.
उदा:- श्री रानडे यांचा अग्रिमाचा आदेश शासनाकडून दिनांक 01.04.2015 रोजी आला आहे. श्री रानडे यांच्या  खात्यात (cmpद्वारे) दिनांक 15.06.2015 रोजी  अग्रिम जमा केले असेल तर जुलै-2015 देय ऑगस्ट-2015 च्या पगारातून मुददल कपात करण्यात येईल.

Leave a Comment